कडधान्य खाणे आरोग्यासाठी चांगले असते, त्यामुळे आहारात कडधान्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कडधान्यांची भाजी बनवण्यासाठी ते आधी भिजत घालणे महत्वाचे असते. पण अनेकदा घाईगडबडीत आपण ते भिजत घालण्यास विसरतो, अशावेळी बनवण्याच्या काही तास आधी ते भिजत घालतो यामुळे त्यांनी मोड येतच नाही. अनेकदा मोड आलेले कडधान्य बाजारातून विकत आणतो. मोड आलेली कडधान्ये पचायला जास्त हलकी आणि शरीराला पोषण देणारी असतात. त्यामुळे एका दिवसात कडधान्यांना मोड आणण्याची सोपी पद्धत जाणून घेऊ…

थंडीच्या दिवसात उबदार वातावरण नसल्याने कडधान्यांना मोड येण्यासाठी खूप वेळ लागतो. अशावेळी विशिष्ट पद्धतीने कडधान्य बांधून ठेवले तर चांगल्याप्रकारे मोड येतात. यामुळे कडधान्यांना मोड येण्यासाठी सोपी पद्धत वापरुन पाहा.

१) सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मूग, मटकी तुम्हा हवे असलेले कडधान्य घ्या. ते पाण्यात भिजत ठेवा.

२) ८ ते ९ तास कडधान्य पाण्यात भिजत ठेवले तर ते चांगल्याप्रकारे फुलतात. यामुळे कडधान्य चांगले भिजल्यानंतर एका जाळीदार भांड्यात काढा.

३) आता कडधान्यातील पाणी पूर्णपणे निथळून टाका. आता त्यावर झाकण ठेवून काही कडधान्य असेच ठेवा.

४) कडधान्यातील पाणी पूर्णपणे निथळले की, एक पातळ सुती कापड घ्या आणि त्यावर हे कडधान्य काढा. कापड थोडा ओलासर करु घ्या.

५) यानंतर हे कडधान्य कापडात घट्ट बांधून ठेवा, या बांधलेल्या मोटळ्या एका जाळीदार भांड्यात पुन्हा साधारण ७ ते ८ तास झाकून ठेवा. यामुळे कडधान्याला चांगले मोड येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६) जाळीदार भांड्यात कडधान्य झाकून ठेवल्यास हवा मोकळी राहते आणि वरच्या बाजूने कडधान्याला चांगली उब मिळते. यामुळे कडधान्य चांगल्याप्रकारे मोठे मोड येतात.