हिंदू धर्मात अनेक मान्यता असून अमावस्या आणि पौर्णिमा यांचे विशेष महत्त्व आहे. पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाची शेवटची तिथी आहे. या वेळी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा १८ डिसेंबर रोजी आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूजा, जप, तपश्चर्या आणि दान यांचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते. एवढेच नाही तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पौर्णिमेची तिथी देवी लक्ष्मीची उपासना करण्यासाठी योग्य असल्याची मान्यता आहे. या दिवशी विधिपूर्वक लक्ष्मी मातेची पूजा करून व्रत वगैरे पाळल्यास संकटे-दु:खांचा नाश होऊन जीवनात सुख-शांती व समृद्धी येते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा, उपवास इत्यादींसोबत या दिवशी या मंत्रांचा जप करणेही आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Margshirsha 2021 pournima laxmi poojan for weath krupa rmt
First published on: 16-12-2021 at 10:01 IST