लवकरच लाँच होणार Maruti Suzuki Celerio; जाणून घ्या मायलेज आणि इतर वैशिष्ट्यै

भारतात Maruti Suzuki Celerio लवकरच लाँच होणार आहे.

maruti-suzuki-celerio

सध्या देशात इंधनाच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. याच दरम्यान, मारुती सुझुकी कंपनी भारतात एक कार लॉन्च करणार आहे. ही कार कमी इंधनावर जास्त मायलेज देईल. या कारबद्दल आतापर्यंत सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, यामध्ये अनेक नवीन फीचर्स देखील जोडण्यात आले असून ते ग्राहकांसाठी खूप उपयुक्त ठरतील, असं म्हटलं जातंय.

नवी Maruti Suzuki Celerio १० नोव्हेंबर रोजी भारतीय कार बाजारात अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. मंगळवारपासून या नवीन सेलेरियोचे बुकिंग सुरू झाले आहे. ११ हजार रुपयांच्या सवलतीसह ही कार ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बुक करू शकतात. माहितीनुसार, मारुती सुझुकी पुन्हा एकदा नवीन खरेदीदार शोधण्यासाठी नवीन सेलेरिओवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. या कारमध्ये नवीन केबिन लेआउटसह अतिरिक्त सुविधा आणि सुरक्षिततेसंदर्भातील हायलाइट्सवर भर दिला आहे.

कारची वैशिष्ट्ये..

या सिलेरियोची बाहेरची प्रोफाइल गोलाकार आहे. तसेच ते नवीन फ्रंट ग्रिल, बोल्डर कॅरेक्टर लाईनसह येते. कारच्या बॉडीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आतून डॅशबोर्ड लेआउटमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून ही कार आता पूर्वीपेक्षा खूपच चांगली दिसते.

सेलेरियोचे मायलेज..

मारुती सुझुकीने नवीन सेलेरियोचे मायलेज वाढवले असेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. कंपनीने अधिकृतपणे या गाडीचे मायलेज जाहीर केले नाही. परंतु ही देशातील सर्वात जास्त इंधन वाचवणाऱ्या पेट्रोल कारपैकी एक असेल, असा दावा अधिकारी करत आहेत. त्यामुळेच लोकांना ही कार अधिक आवडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या काळात इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लोक अस्वस्थ होत असताना या कारचे मायलेज चांगले असेल तर ती लोकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आणखी बळावते.

कंपनीने अलीकडेच म्हटलं होतं की करोनामुळे गेल्या तिमाहीत सुमारे १.१६ लाख वाहनांचे उत्पादन होऊ शकले नाही. ही कमतरता जगभरातील जवळजवळ प्रत्येक ऑटो कंपनीसाठी राहिली आहे. त्यामुळे येत्या काळात ते वाहनांच्या डिलिव्हरीच्या वेळेत बदल करू शकतात, असे मारुतीने सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maruti suzuki celerio will launch soon know about price new features and strong mileage hrc

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या