Xiaomi कंपनीच्या Redmi Y2 आणि Mi TV चा आज सेल आहे. Redmi Y2 साठी amazon.in आणि mi.com वर आज दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू झाला आहे. तर Mi TV साठी mi.com आणि Flipkart.com वर सेल आहे.
Redmi Y2 च्या ऑफर्सबाबत बोलायचं झालं तर हा फोन अॅमेझॉनवर 475 रुपयांच्या इएमआयवर खरेदी करता येणार आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर एअरटेलकडून 1800 रुपयांचा कॅशबॅकही दिला जात आहे. तसंच 240GB पर्यंत डेटा मोफत मिळणार आहे. कॅशबॅक आणि डेटाची ऑफर amazon.in आणि mi.com या दोन्ही वेबसाइट्सवर आहे. या स्मार्टफोनसाठी mi.com वर एक्सचेंज ऑफर देखील आहे.
Mi TV साठी फ्लिपकार्टवर ऑफर असून केवळ 465 रुपयांच्या इएमआयवर हा टीव्ही खरेदी करता येईल. अॅक्सिस बँकेच्या क्रे़डिट कार्डने खरेदी केल्यास 5 टक्के सूट मिळेल.
Redmi Y2 च्या 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Mi LED Smart TV 4A 32 ची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 43 इंच टीव्ही 22 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 55 इंच टीव्हीची किंमत 44 हजार 499 इतकी आहे.