मायक्रोसॉफ्टने या टेक्नॉलॉजी कंपनीने नुकतेच नवीन चार लॅपटॉप लॉन्च केले आहेत. विद्यार्थ्यांची लॅपटॉपची आवश्यकता लक्षात घेऊन कंपनीने हे लॅपटॉप लाँच केले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे चारही लॅपटॉप विंडोज १० वर काम करतात. यात माइक्रोसॉफ्ट लर्निंग टूलचा समावेश करण्यात आल्याने लिहिणे-वाचणे आणि इतर अनेक गोष्टी करणे सोपे आहे.

सध्या बाजारात असलेल्या इतर कंपन्यांच्या लॅपटॉपला मायक्रोसॉफ्टचे हे नवीन लॅपटॉप चांगलीच टक्कर देण्याची शक्यता आहे. या लॅपटॉपमधील दोन लिनोव्हा कंपनीने तर इतर दोन जेपी कंपनीने विकसित केले आहेत. लॅपटॉपची बॅटरी हे यातील मुख्य विषय असून १० तास चालेल अशी बॅटरी देण्यात आली आहे. Lenovo 100e या लॅपटॉपला 2 GB एलपीडीडीआर 4 रॅम दिली आहे. यात ११.६ इंचाचा एचडी अँटीग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉपचे वजन १.२२ किलोग्रॅम आहे. याची किंमत सुमारे १२,००० पासून सुरू होते.

Lenovo 300e टू-इन-वन कन्व्हर्टेबल पीसी हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट एक्जुकेशन सीरीजच्या अंतर्गत लॉन्च केला आहे. यात इंटेल पेंटियम प्रोसेसर आणि ४ जीबी एलपीडीडीआर४ रॅम देण्यात आली आहे. याचे स्टोरेज १६ जीबी ईएमएमसी इतके आहे. त्याचबरोबर ११.६ इंचाचा एचडी मल्टीटच डिस्प्ले आहे. याची किंमत १७,८०० रुपयांपासून सुरू होते. याची बॅटरी लाईफ ८ तासांची असेल. याव्यतिरिक्त एज्युकेशन रेंजवर अजून दोन लॅपटॉप सादर करण्यात आले आहेत. जेपीने लॉन्च केलेले हे लॅपटॉप Classmate Leap T303 ला सपोर्ट करतात. याची किंमत १३ ते २० हजार रुपयांदरम्यान आहे.