न्याहरीच्या वेळेस दूध प्यायल्याने मधुमेहींमधील रक्त शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होत असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे. कॅनडामधील टोरंटो विद्यापीठ आणि गिलेफ विद्यापीठातील संशोधकांना न्याहरीत बदल केल्यास मधुमेहींना अनेक फायदे होत असल्याचे आढळले. न्याहरी करताना दूध प्यायल्याने जेवनानंतर रक्तात होणाऱ्या शर्करेतील वाढ कमी होते. त्याचप्रमाणे  दिवसभर भूक कमी लागते असे आढळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात चयापचयासंबंधित विकाराचे प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह या आरोग्याच्या मुख्य समस्या आहेत, असे गिलेफ विद्यापीठातील डगलस गोफ यांनी म्हटले. त्यामुळे वैयक्तिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि मधुमेह, लठ्ठपणा या समस्येवर उपाय म्हणून आहारविषयक धोरण तयार करणे आवश्यक आहे, असे गोफ यांनी सांगितले. संशोधकांनी न्याहरीसोबत प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी दुधातील व्हे प्रथिनांचे प्रमाण वाढवले. याचा रक्तातील शर्करेवर आणि दिवसभरातील आहारावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. नैसर्गिकरीत्या दुधामध्ये असणारी प्रथिने आतडय़ांतील जणूंकामध्ये सोडली जातात. ज्यामुळे चयापचयाची प्रक्रियेचा वेग मंदावतो आणि पोट भरल्यासारखे वाटते. व्हे प्रथिनांमुळे हे परिणाम लवकर दिसून येत असून कॅसिझन प्रथिनांमुळे हे परिणाम जास्त काळ टिकतात. संशोधकांना व्हे प्रथिनांचे सेवन केल्यानंतर दुपारच्या जेवनात मोठय़ा प्रमाणात बदल झाल्याचे आढळून आले नाही. पण कार्बोहायड्रेट अधिक असणाऱ्या आहारासह सकाळी दूध प्यायल्याने दुपारच्या जेवणानंतरही रक्तातील शर्करेच्या पातळीत घट दिसून आले. प्रथिने जास्त असलेल्या दुधामुळे याहून अधिक चांगले परिणाम आढळून आल्याचे संशोधकांनी म्हटले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk is good for health
First published on: 24-08-2018 at 00:57 IST