आपल्या आहारातील अनेक पदार्थांबाबत आपल्या मनात गैरसमज असतात, भात हा त्यातलाच एक. भातामुळे लठ्ठपणा येतो किंवा भातामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते असा आपल्याकडे समज आहे. मात्र भारतात आजही दक्षिण भागात किंवा कोकणासारख्या भागात भात हेच मुख्य अन्न आहे. याठिकाणी कायम तांदूळाचे पदार्थ खाल्ले जातात. पूर्वीच्या काळीही मोठ्या प्रमाणात भात खाल्ला जायचा. पण अशा कायम भात खाण्याने या लोकांना काही त्रास होत नाही हे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लठ्ठपणा हे अनेकांचं भात न खाण्याचं प्रमुख कारण आहे. भातातील एक संयुग तुमचं हृदय निरोगी राहण्यासाठी मदत करतं. म्हणूनच जपानमध्ये हृदयरोगानं दगावलेल्या लोकांची संख्या फार कमी आहे. असे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. तांदूळामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने तो आरोग्यासाठी चांगला असतो असेही काही संशोधनातून समोर आले आहे. भाताबरोबर आपण भाजी, आमटी खात असल्याने भातातून थेट शरीरावर होणारे परिणाम होत नाहीत. अनेकदा आहारतज्ज्ञही भात खा पण तो प्रमाणात खा असे सांगतात. त्यामुळे भात पूर्ण बंद करणे हा लठ्ठपणा किंवा रक्तातील साखर कमी करण्याचा उपाय नव्हे असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भात आरोग्यासाठी चांगला नसतो हे विधान वादग्रस्त आहे असे म्हणता येईल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misconceptions about eating rice it is good for health
First published on: 23-11-2017 at 20:05 IST