Monsoon Home Tips: पावसाळा सुरू झाला की घरात एक गोष्ट हमखास घडते आणि ती पाहून अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. तुम्ही कितीही स्वच्छता ठेवली, तरी या समस्येपासून सुटका मिळत नाही. पण तुम्हाला सांगतो, यावरचा उपाय तुमच्या घरातच आहे आणि त्यासाठी लागणार आहे फक्त दोन रुपये खर्च. हा जुगाड ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, कारण यासाठी न वापरायचं आहे डिटर्जंट, न केमिकल तर वापरायची आहे एक छोटीशी मेणबत्ती, कशी? वाचा पुढे…
पावसाळा सुरू झाला की घरभर ओलावा, कुबट वास, भिंतींवर बुरशी, आरशांवर आणि नळांवर पाण्याचे डाग, घसरट लादी अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्ही कितीही स्वच्छता ठेवली तरी काही गोष्टींचा त्रास टाळणं अवघडच. पण, यापैकी एका त्रासाचा फक्त दोन रुपयांत कायमचा बंदोबस्त करता येतो, तोही अगदी घरच्या घरी. हो, तुम्ही बरोबर वाचलं! फक्त दोन रुपयांची एक सामान्य मेणबत्ती वापरून तुम्ही नळांवर होणारे चिवट पाण्याचे डाग, गंज आणि डागधब्बे सहज टाळू शकता. ही युक्ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
नेमकं करायचं काय?
पावसाळ्यात नळांवर सतत पाण्याचे थेंब साचत राहतात आणि त्यामुळे स्टील अथवा क्रोम नळांवर (धातूचे आवरण असलेले नळ) गंज, डाग आणि काळसरपणा येतो. पण, यावर उपाय अगदी सोपा आहे. साधी पांढरी मेणबत्ती घ्या आणि ती नळावर सर्वत्र घासा. म्हणजेच एक थर मेणाचा नळावर बसवायचा आहे. मेणामुळे पाणी नळावर थांबत नाही आणि थेंबांचा प्रभावही राहत नाही. परिणामी, डाग, गंज किंवा कुरुपपणा टाळता येतो.
@simplymarathi या यूट्यूब चॅनेलवर या भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, तो पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी हा उपाय करून त्याचा सकारात्मक अनुभवदेखील शेअर केला आहे.
आणखी काही पर्याय?
जर मेणबत्ती नसेल तर घरात असणारी व्हॅसलिनसारखी पेट्रोलियम जेलीदेखील नळासाठी वापरता येते. मात्र, रंगीत मेणबत्त्या टाळा, कारण त्या काही वेळा नळांवर डाग सोडू शकतात. मेण लावल्यानंतर मऊ कापडाने नळ पुसा, म्हणजे नळ चमकदार दिसेल आणि डागांचाही प्रश्न मिटेल.
येथे पाहा व्हिडीओ
@simplymarathi या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट करून कळवा.
तुम्हीही हा जुगाड करून पाहा आणि अनुभव आमच्यासोबत शेअर करा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे, लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)