Oily Skin Care Routine : तेलकट त्वचा असलेल्या बहुतेक जणांना मुरुमे, छिद्र, काळे डाग अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण, त्वचा कोणतीही असो चुकीचा फेसवॉश, चुकीचे स्किनरुटीन, चेहऱ्याची योग्य काळजी न घेणे यामुळे चेहरा आणखीन खराब होऊ लागतो. फक्त झोपण्यापूर्वी नाही तर सकाळी उठल्यानंतर पण आपण त्वचेची योग्य काळजी घ्यायला हवी. तर आज आपण तेलकट त्वचा असणाऱ्यांनी सकाळी उठल्यावर चेहऱ्याची काळजी कशी घेतली, चेहऱ्याला नक्की कोणत्या गोष्टी लावल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेणार आहोत…
सगळ्यात पहिला तर सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस स्किनकेअर रूटीन करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या त्वचेवर लावलेली उत्पादने त्वचेचे आरोग्य वाढवण्यास मदत करतात. म्हणूनच, तेलकट त्वचेसाठी तुम्ही योग्य उत्पादने वापरता आहे का याबद्दल सगळ्यात आधी खात्री करून घ्या. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर पुढील गोष्टी करायला विसरू नका.
ऑइल फ्री क्लीन्झर – तुमच्या दिवसाची सुरुवात सौम्य, ऑइल फ्री क्लीन्झरने करा. यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी न होता तेल, घाण आणि घाम काढून टाकण्यास मदत होते. ऑइल फ्री क्लीन्झरखरेदी करताना, सॅलिसिलिक ॲसिड किंवा टी ट्री ऑइल सारख्या घटक आहेत का तपासून घ्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रे बंद होण्यास आणि ब्रेकआउट्स रोखण्यास मदत होते.
टोनर लावा – टोनर वापरल्याने त्वचेचा पीएच संतुलित होण्यास आणि चेहऱ्यावरील छिद्रे घट्ट होण्यास मदत होऊ होते. अल्कोहोल-मुक्त टोनर विकत घ्या; ज्यामध्ये विच हेझेल किंवा नियासिनमाइड सारखे घटक असतात. कारण – यामध्ये चेहऱ्यावर सतत दिसणारे तेल नियंत्रित करण्यास आणि त्वचा कोरडी न करता जळजळ कमी करण्यास मदत करते.
हलके सीरम वापरा – नियासिनमाइड, हायलुरोनिक ॲसिड किंवा झिंक असलेले हलके सीरम वापरा. या सिरममध्ये असणारे घटक तेल नियंत्रित करून त्वचेला हायड्रेट करतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे आणि लालसरपणा कमी होतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी जड किंवा तेलकट सीरम टाळावे जे छिद्रे बंद करतात.
ऑइल फ्री जेलने मॉइश्चरायझर लावा – तुमची त्वचा तेलकट असली तरीही तुम्हाला मॉइश्चरायझर वापरणे खूप महत्वाचे आहे. नॉन-कॉमेडोजेनिक आणि तेलमुक्त मॉइश्चरायझर वापरा- कारण ते अतिरिक्त तेल आणि चमक न कमी करता चेहऱ्याचे हायड्रेशन राखण्यास मदत करते. तुम्ही कोरफड किंवा ग्रीन टीसह जेल-आधारित मॉइश्चरायझर देखील निवडू शकता.
सनस्क्रीन लावायला विसरू नका – ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF 30 किंवा त्याहून अधिक मॅट-फिनिश असणारे सनस्क्रीन वापरा. ऑइल फ्री त्वचेसाठी बनवलेले फॉर्म्युले तपासा. सनस्क्रीन काळे डाग, सूर्यप्रकाशाचे नुकसान आणि अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत करू शकते.
जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा सतत धुता तेव्हा चेहऱ्याचे नैसर्गिक तेल निघून जाते; ज्यामुळे त्वचेतून आणखी तेल तयार होते; जे तेलकट त्वचेसाठी समस्या असू शकते. त्यामुळे फक्त सकाळी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा चेहरा स्वच्छ धुवा. त्याचबरोबर भरपूर पाणी प्या, तेलकट आणि साखरेचे पदार्थ कमी करा आणि फळे, भाज्या खा. यामुळे एकूणच त्वचेच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.