सध्या वैशाख वणवा अर्थात मे महिना सुरु आहे. या महिन्यातील उन्हाचा तडाखा हा सर्वांनाच भोगावा लागतो. आपण उन्हाची तीव्रता जरी कमी करु शकत नसलो तरी त्यापासून वाचण्यासाठी काही उपाय मात्र नक्कीच करु शकतो. या काळात शरीरात पाण्याच्या पातळीचा समतोल राखणेही तितकेच गरजेचे असते. पाण्याव्यतिरिक्तही ज्या फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये पाण्याचा अधिकाधिक अंश आहे, अशा घटकांचा समावेश आपल्या आहारात करणे गरजेचे असते.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ही पातळी कमी झाल्याने चक्कर येणे, उलट्या होणे यांसारखे त्रास जाणवू लागतात. या त्रासापासून सुटका करायची असले तर आपल्या आहारात ‘मोसंबी’ या फळाचा समावेश करणे गरजेचे आहे.
आंबट- गोड मोसंबीचा समावेश आपल्या आहारात केल्यास उन्हाळ्यात होणा-या आजारापासून आपली नक्कीच सुटका होऊ शकते. मोसंबीमध्ये ‘व्हिटामिन सी’ आणि ‘पोटॅशिअम’चे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे त्याच्यात ‘फायबर’चे प्रमाणही अधिक आहे.

Toronto airport cargo facility Heist
कॅनडामध्ये ‘मनी हाइस्ट’ प्रमाणे सर्वात मोठी चोरी; भारतीय वंशाच्या आरोपींनी ४०० किलो सोने पळविले
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

१. अनेकांना ‘व्हिटामिन सी’च्या कमतरतेमुळे ‘स्कर्वी’चा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये हिरड्यांमधून सतत रक्त येते. या आजारापासून सुटका करायची असेल तर मोसंबीचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘व्हिटामिन सी’ चे प्रमाण आढळून येते.

२. अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अॅसिडीटी म्हणजेच अपचनाची समस्या वारंवार उद्भवत असते. यामध्ये सतत जळजळ होणे, अस्वस्थ वाटणे यासारख्या गोष्टींची लक्षणं आढळून येतात. आपली पचनक्रिया व्यवस्थित होत नसेल तर अशी समस्या निर्माण होऊ शकते. मोसंबीच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते आणि अॅसिडीटीचे प्रमाण कमी होते.

३. मधुमेहाने ग्रस्त व्यक्तींच्या खाण्यावर तर अनेक बंधने असतात. मात्र हा मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर दोन चमचे मोसंबीचा रस, ४ चमचे आवळ्याचा रस, १ चमचा मध हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४. अनेक वेळा काही जणांच्य़ा रक्तामध्ये गुठळ्या होत असल्याचे ऐकण्यात येते. मात्र मोसंबीच्या सेवनाने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.

५. मोसंबीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने त्याच्या सेवननाने वजन कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांना काही संसर्ग झाल्यास मोसंबीच्या रसाचे काही थेंब पाण्यात टाकून त्या पाण्याने डोळे धुतल्यास संसर्गापासून सुटका होते. तसेच मोसंबीमध्ये रोग प्रतिकारक शक्तीही मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे उन्हाळ्यातील आजारापासून सुटका करायची असेल तर आपल्या आहारात पालेभाज्या, पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे यांचा समावेश करणे गरजेचे आहे. तरच तुमचा हा उन्हाळा सुसहाय्य होईल हे नक्की.