Mosquito Repellent Plants : पावसाळ्यात थंड वातावरण अनेक प्रकारच्या डास, मच्छर आणि लहान लहान कीटकांचा प्रार्दुभाव वाढतो. या कीटकांमुळे अंगाला खाज येते, शिवाय डेंग्यू, मलेरिया किंवा चिकनगुनिया सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. यावेळी डासांचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशके आणि केमिकल रिपेलेंट्सचा वापर केला जातो, पण त्यातील केमिकल आरोग्यासाठी हानिकारक असते. अशावेळी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने घरातील डास, मच्छर कीटक कमी करू शकता. यासाठी तुम्हीला घराच्या बाल्कनीक काही खास रोपं लावाली लागतील. ही झाडे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवण्याबरोबर हवा ताजी ठेवतात. तसेच डास, मच्छरांनाही घरापासून दूर पळवतात.

सिट्रोनेला

सिट्रोनेला या रोपाला लिंबूसारखा तीव्र वास येतो, यामुळे या रोपाचा वापर डासांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. या रोपामध्ये एक तेल असते जे बहुतेकदा मेणबत्त्या आणि स्प्रेमध्ये वापरले जाते. लेसयुक्त पानांचे हे रोप खिडकी किंवा बाल्कनीत जिथे सूर्यप्रकार असतो तिथे चांगल्या प्रकारे वाढते. डासांना नैसर्गिकरित्या दूर ठेवण्यासाठी हे रोप घरात किंवा बाहेर ठेवता येते. या रोपाच्या वासामुळे डासांसह, लहान कीटकही घरापासून दूर ठेवते.

लॅव्हेंडर

डासांना लॅव्हेंडरचा वास अजिबात आवडत नाही, म्हणून डासांना दूर ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. शिवाय या रोपाचा वापर अरोमाथेरपीमध्ये आणि अनेकजण जेवणातही विविझ प्रकारे करतात. डासांना दूर ठेवण्यासाठी आणि घरात गोड सुगंध पसरवण्यासाठी तुम्ही हे रोप तुमच्या घराच्या बाल्कनीत लावू शकता.

पुदिना

पुदिन्याची पाने केवळ जेवणातच वापरली जात नाहीत तर औषध म्हणूनही वापरली जातात. यासह त्याचा वासामुळे डास काही मिनिटांत दूर पळतात. या रोपाचा ताजा प्रभाव हवा देखील ताजी ठेवतो. तसेच तीव्र, तिखट वास, विशेषतः मेन्थॉलमुळे कीटकांना घरापासून दूर ठेवण्यास मदत करते. तुम्ही हे रोप तुमच्या घराच्या छतावर आणि बाल्कनीत लावू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लँटिना

लँटिना हे अगदी छोटसं रोप आहे, ज्याला सुंदर वळा, निळा, हिरवा, लाल, केशरी, पांढरा फुलं येतात. हे रोप घराच्या बाल्कनीत लावल्यास त्याच्या वासामुळे डास घराच्या आजूबाजूलाही फिरकत नाही.