Pomegranate peel hair color: आजकाल अनेक लोकांचे केस अकालीच पांढरे होऊ लागले आहेत. हे पांढरे केस फक्त केसांच्याच सौंदर्यावर परिणाम करीत नाहीत, तर ते व्यक्तिमत्त्वावरही परिणाम करतात. जीवनशैली, मानसिक ताण, प्रदूषण आणि आहारातील पोषणाची कमतरता ही केस पांढरे होण्यामागची मुख्य कारणे असू शकतात. त्यामुळे अनेक लोक केस काळे करण्यासाठी महागडे हेअर प्रॉडक्ट्स वापरतात. मात्र, घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साध्या गोष्टींचा वापर करूनही आपण नैसर्गिक मार्गाने केस काळे करू शकतो. त्यासाठी डाळिंबाची साल अतिशय फायदेशीर ठरते. डाळिंबाची साल केसांना पोषण देतो आणि नैसर्गिक रंग निर्माण करण्यास मदत करतो.

डाळिंबाच्या सालीने नैसर्गिक केसांचा रंग कसा तयार करावा?

डाळिंबाच्या सालींनी हेअर डाय बनविता येईल. त्यासाठी प्रथम एक कपभर डाळिंबाच्या सालींचे तुकडे घ्या. सालीचे हे तुकडे तव्यावर किंवा कोरड्या पॅनवर चांगले भाजून घ्या. थोड्या वेळाने सालीचे हे तुकडे हलकेसे काळे होऊ लागतात. त्यानंतर यामध्ये काही प्रमाणात कलौंजी दाणे घालून साधारण दोन मिनिटे परतून घ्या.

डाळिंबाच्या सालीचे भाजलेले तुकडे आणि कलौंजीचे दाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर करा. आता या पावडरमध्ये एक चमचा आवळा पावडर आणि अर्धा कप मोहरीचे तेल घाला. हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करा. या मिश्रणामुळे केसांना चांगले पोषण मिळते आणि ते मऊ व चमकदार होतात, तसेच केसांना नैसर्गिक काळेपणा येतो.

हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपले केस हलकेसे ओले करून, त्यावर ते समान रीतीने लावा. मिश्रण पूर्ण केसांवर लावल्यावर ते सुमारे एक तास तसेच राहू द्या. नंतर हलक्या सौम्य शॅम्पूने केस धुऊन घ्या. या प्रक्रियेनंतर केस नैसर्गिकरीत्या काळे आणि चमकदार दिसू लागतात. डाळिंबाच्या सालीमुळे नैसर्गिक रंग देण्याबरोबरच केसांना मजबुती देते आणि केस गळती कमी करण्यासही मदत करतात. त्याशिवाय हे मिश्रण केवळ केसांच्या रंगासाठीच नाही, तर केसांची आरोग्यदायी लांबी आणि मऊपणा टिकवण्यासाठीही फायदेशीर आहे.

घरच्या घरी डाळिंबाच्या सालीद्वारे बनवलेला हा नैसर्गिक हेअर डाय महागड्या रासायनिक प्रॉडक्टपेक्षा जास्त सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहे. बनवलेला हा नैसर्गिक हेअर डाय नियमितपणे वापरल्यास केस काळे राहतात, चमकदार बनतात आणि त्यामुळे तुमच्या केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहते.