थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी सतावते. उत्तम त्वचा आणि फ्रेश लुक राखण्यासाठी वेगवेगळी मॉयश्चरायझर वापरण्याची जणू परंपराच आता सुरू झाली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. थंडीतही त्वचा उजळ आणि सुंदर असावी यासाठी खर्चिक रासायनिक मॉयश्चरायझर वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक पर्यायही उपलब्ध आहेत. बोचऱया थंडीत त्वचेला मुलायम राखण्यासाठी काही नॅचरल टिप्स..
कोरफड- बहुगुणी कोरफड त्वचा कोरडी पडली असल्यास कोरफडीचा गर किंवा रस त्वचा मुलायम आणि तजेलदार राखण्यासाठी उपयोगी ठरतो.
गुलाबपाणी- गुलाब पाण्याचा त्वचेवर वापर केल्याने चेहऱयावरील ब्लॅकहेड्स, तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते.
मध- त्वचेचा मखमलीपणा कायम राखण्यासाठी मधाचा उपयोग होतो. त्याचबरोबर चेहऱयावरील पुरळ घालविण्यासाठीही मधाचा उपयोग केला जातो.
ऑलिव्ह ऑईल- थंडीमुळे रखरखीत झालेल्या त्वचेला मुलायम बनविण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा उपयोग केला जातो. परंतु, या ऑईलचा उपयोगही योग्य प्रमाणात करायला हवा. बाजारात सध्या ऑलिव्ह ऑईलचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natural moisturizer for dry face
First published on: 17-01-2014 at 08:36 IST