How To Rid Rats From Home : घरात उंदरांचा वावर किळसवाणा आणि नकोसा वाटू लागतो. एक जरी उंदीर घरात शिरला तरी त्याने डोकेदुखी वाढते. कारण उंदीर घरात शिरल्यानंतर अगदी लहान- मोठ्या वस्तू कुरतडून त्याची नासधूस करुन टाकतात. यात जर उंदरांची लहान पिल्लं असतील तर त्यांना पकडणे आणखी कठीण होते. अशा परिस्थितीत उंदरांमुळे घराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही खालील काही सोपे उपाय करुन पाहू शकता. यामुळे घरातून उंदीर काही तासांत कायमचे दूर जातील.

घरातून उंदरांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय

घरात उंदीर आणि त्यांच्या पिल्लांना न मारता त्यांचा पळवून लावण्याचे अनेक प्रभावी आणि सुरक्षित उपाय आहेत. यासाठी, तुम्ही अशा काही गोष्टी वापरण्यास सांगत आहोत ज्यांचा वास उंदरांना अजिबात आवडत नाही. त्यापैकी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे पेपरमिंट ऑइल. याचा वापर करून तुम्ही तुमचे घर स्वच्छ आणि उंदीरमुक्त करू शकता. पेपरमिंट ऑइलचा वासाने आपल्याला ताजेतवाने वाटू शकतो, परंतु उंदरांना तो वास खूप असह्य होतो.

यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पेपरमिंट ऑइलमध्ये मिसळलेला कापसाचा बोळा ठेवा याने उंदीर लगेच घर सोडून पळून जातील. तसंच पुन्हा त्यांचा वावर घरात दिसणार नाही. त्यामुळे पेपरमिंट उंदीर घालवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

उंदरांपासून सहज सुटका मिळवण्यासाठी करा पुदिन्याचा वापर

पुदिन्याचा तीव्र वास उंदरांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करते यामुळे त्रासाने ते दूर पळण्याचा प्रयत्न करतात. उंदरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा, यामुळे तुमच्या घरात उंदरांचा प्रवेश टाळता येईल. पुदिन्याचा वास खूप स्ट्राँग असतो. ज्याचा वास उंदरांना सहन न झाल्याने उंदीर नाहीशे होतात. उंदीर वारंवार येतात अशा ठिकाणी तुम्ही वाळलेल्या पुदिन्याची पाने किंवा पुदिन्याचे रोपे देखील ठेवू शकता.

तेजपत्त्याचा करा वापर

घरातील उंदीर हाकलण्यासाठी तेजपत्ता हा एक चांगला उपाय आहे. यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तमालपत्र ठेवा ज्याठिकाणी उंदरांचा वावर जास्त आहे. याच्या सुगंधाने उंदीर तुमच्या घरातून पळून जातील. तसंच पुन्हा त्यांचा त्रास तुम्हाला होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उंदरांना पळवण्यासाठी तंबाखू प्रभावी उपाय

तंबाखू उपाय देखील उंदीर दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.यासाठी एका भांड्यात चिमूटभर तंबाखू घेऊन त्यात २ चमचे देशी तूप आणि बेसन घालून गोळ्या बनवा. या गोळ्या घराच्या त्या कोपऱ्यात ठेवा ज्या कोपऱ्यात वारंवार उंदरांचा वावर असतो. उंदीर त्यांना खातातच ते बेशुद्ध अवस्थेत घर सोडून बाहेर पडतात.