नवरात्रौत्सवाला उद्यापासून सुरूवात होते आहे. या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो. नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा गेल्या दशकभरापासून सुरू आहे. त्यामुळे त्या त्या वाराला त्या त्या रंगांची वस्त्रे परिधान करणारा मोठा महिला वर्ग तुम्हाला दिसेल. वाराप्रमाणे वस्त्रे परिधान केल्याने दिवस चांगला जातो किंवा तो रंग शुभ असतो ही आपली धारणा असते. ही प्रथा किंवा हा ट्रेंड कुठून माहितीये?

देवीमाहात्म्य : रचना, इतिहास आणि परंपरा

खरंतर धर्मशास्त्रात रंगांची प्रथा नाही. नवरात्रीत नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची संकल्पना साधरण दहा पंधरा वर्षांपासून सुरू झाल्याचं खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे. नऊ दिवसांत या रंगांमुळे साऱ्याजणी एकमेकींच्या जवळ येतात. त्यांच्यामध्ये समानता दिसते. या दिवसात गरीब- श्रीमंत अशी दरी दिसत नाही. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते. हे रंग एकमेकींना बांधून ठेवतात. म्हणून एकोपा, समानता यावी यासाठी नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली.

वाचा : राजस्थानातील देवीची मंदिरे