रिक्रिएशनल व्हेइकल अशी बिरुदावली मिरवणारी किआची कॅरेन्स ही कार बाजारात येणार आहे. वैशिष्टय़पूर्ण डिझाइनसह व्हीलबेस सर्वात लांब असलेली थ्री-रो सीटर अशी ही कार आहे. यात सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग असून हे किआ कॅरेन्स कारचे वैशिष्टय़ आहे. २०२२ सालच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील निवडक बाजारपेठांमध्ये ही कार उपलब्ध होणार आहे. मल्टी युटिलिटी व्हेईकल प्रकारातील कार असली तरी ती एसयूव्ही प्रकारातील कार आहे.

स्लायिडग प्रकारचा सीट अंडर ट्रे, रिट्रॅक्टेबल सीटबॅक टेबल, रियर डोअर स्पॉट लँप आणि थर्ड रोमध्ये बॉटल आणि गॅजेट होल्डर यांसारखे फिचर्स यात आहेत. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारात या कारची मॉडेल्स आहेत. एसयूव्हीचा लूक असलेली ही कार असून उत्तम अंतर्गत रचना यात आहे. सुमारे २६ सें.मी. एचडी  टचस्क्रीन, नेव्हिगेशनची सोय,अ‍ॅम्बीअण्ट मूड लायटिंगची सुविधा,  मोठी केबिन स्पेस यात आहे. स्काय लाईट सनरूफ, एक टच सोपे इलेक्ट्रिक टंबल अशा सुविधाही या कारमध्ये देण्यात आल्या आहेत.

चालक अचानक ब्रेक दाबतो किंवा वळण घेतो त्यावेळी गाडीत बसलेल्यांना स्थिरता देऊ शकतो अशी यंत्रणा असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  फ्रंट पार्किंग सेन्सर,  रेन-सेन्सिंग वायपर या सुविधा आहेत. स्मार्टफोन वायरलेस चार्जर, किआ लोगो प्रोजेक्शनसह मागील दाराला स्पॉट लँप, मागील दाराला सनशेड पडदे अशी सोयीही या कारमध्ये आहेत. वेगवेगळय़ा रंगांमध्येही ही कार मिळू शकेल.

जीटी फोर्सद्वारे तीन ईव्ही दुचाकी

जीटी फोर्सने जीटी ड्राइव्ह, जीटी ड्राइव्ह प्रो या दोन ई स्कूटर आणि प्रोटोटाइप ही ई दुचाकी बाजारात आणली आहे. जीटी ड्राइव्ह – ही दुचाकी ६० किमी प्रति तास ही सर्वोच्च गती देते, तर एका चार्जवर १५० किमी इतके अंतर पार करता येते. हे उत्पादन हे लिथियम- आयन बॅटरीमध्ये उपलब्ध आहे. त्यासह इकोनॉमी, स्टँडर्ड आणि टबरे हे तीन ड्राइव्ह मोडस देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये क्रूझ नियंत्रण प्रणालीसुद्धा उपलब्ध केलेली आहे. जीटी ड्राइव्ह प्रो – कमी गतीच्या प्रकारातील ही ई- स्कूटर छोटय़ा अंतरावर प्रवासासाठी सेवा देण्यासाठी बनवण्यात आली आहे. कुटुंब, महिला व मुलांच्या गरजा लक्षात घेऊन या उत्पादनामध्ये सर्वासाठी सुविधा देण्यात आली आहे. एका चार्जवर ती सहजपणे ७५ किमी इतके अंतर पार करू शकते आणि २५ कि.मी. प्रतितास ही तिची सर्वोच्च गती आहे. हे उत्पादन लीड एसिड आणि लिथिअम आयन बॅटरी वर्शन्स या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. तसेच पहिल्या ई मोटरसायकल प्रोटो टाइपचेही अनावरण केले आहे. २०२० वर्षांच्या दुसऱ्या उत्तरार्धात ही दुचाकी बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार आहे.