आपल्या घरात एखादा कुत्रा किंवा मांजर पाळावी अशी आपल्यापैकी अनेक जणांची खूप मनापासून ईच्छा असेल. हा अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणेच मोठ्या मायेने आणि प्रेमाने प्रत्येक जण आपल्या घरातील या प्राण्यांची काळजी घेत असतात. घरातील एखाद्या लहान मुलाला जितके प्रेम दिले जाते तितकेच प्रेम कुटुंबातील प्रत्येक सदस्य या प्राण्यांवर करत असतो. जर तुम्ही देखील आपल्या घरात एखादा पाळीव प्राणी पाळायचा विचार करत असाल किंवा त्यांच्या सोबत चांगलं बॉंडिंग कसं तयार होईल? त्यांना नेहमी आनंदात आणि चांगल्या मूडमध्ये कसं ठेवता येईल याचा विचार करत असाल तर लाईफस्टाईल ब्लॉगर आणि स्टाईलीस्ट दिव्या सिंह विश्वनाथ यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’सोबत शेअर केलेल्या या पाच गोष्टी नक्की करून पहा.

विश्वास निर्माण करा

घर आणि आजूबाजूच्या परिसराशी परिचित होण्यासाठी आपल्या पाळीव प्राण्यांना वेळ द्या. तसेच हे प्राणी तुमच्या आसपासच्या व तुमच्या जीवनशैलीशी निगडीत असलेल्या गोष्टींशी ओळख झाल्यास त्यांचा तुमच्यावर व इतर गोष्टींवर सहज विश्वास बसतो. तसेच त्यांच्याशी सौम्य आणि प्रेमळ भाषेत बोला.जास्त मोठ्या आवाजात तुम्ही पहिल्यांदा त्यांचाशी एकदम कठोर शब्दात बोलात तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भीती निर्माण करतो. त्यांना तुमच्या जवळ येताना अस्वस्थ वाटू शकेल. धीर धरा. कधीकधी ते सेटल होण्यास थोडा जास्त वेळ घेऊ शकतात.

स्पर्श

तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याला बाहेर कुठे फिरायला घेऊन गेलात तर त्यांच्याशी बोला गप्पा मारा, तसेच बोलता बोलता त्यांना स्पर्श करा व त्यांना मिठी मारा. याने तुमच्या स्पर्शाची ओळख होत जाईल. दररोज त्यांना तुमच्या स्पर्शाची सवय लागते आणि यामुळे त्यांना दिलास मिळतो, सुरक्षित वाटतं.

संवाद

तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याशी संवाद साधताना त्यांच्याशी सौम्य आणि सकारात्मक बोला. त्यांना नेहमी फिरायला घेऊन जा, शक्य असल्यास त्यांना मिठी मारा, त्यांच्याबरोबर खेळा, त्यांच्याशी बोला, अशाने तुमच्यामधले बॉंडिंग चांगल तयार होईल. तुम्ही त्यांचे चांगले आवडीचे व्यक्ती बनाल. त्याचबरोबर ते तुमच्या आणखी जवळ येतील.

प्रशिक्षण आणि संवाद

तुमच्या पाळीव प्राण्यांना तुम्ही प्रेमाने ट्रेनिंग द्या. त्यांना लवकर ट्रेनिंग द्या. त्यांना ट्रेनिंग देताना सध्या सोप्या पद्धतीने ट्रेनिंग द्या. जेणेकरून ते तुमच्या आज्ञेचे पालन करतील. तसेच ट्रेनिंग देताना तुमच्यातील आणि त्याच्यातील संबंध चांगले होतील. तुमच्यातील संवाद देखील वाढतो.

जेवणाची निश्चित वेळ

त्यांच्या जेवणाची वेळ निश्चित ठेवा आणि तुम्ही स्वतः त्यांना जेऊ घाला. तुमच्यात चांगले संबंध निर्माण झाल्याने ते तुमच्यावर अवलंबून राहायला लागतील. त्यामुळे, त्यांची योग्य ती सर्व काळजी घ्या. आपल्या लाडक्या प्राण्यांना काहीही कमी पडू देऊ नका