सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दर स्थिर आहेत. नवीन दरानुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज सोमवार ६ डिसेंबर रोजी इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोल आठ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपयांवरून ९५.४१ रुपयांवर आली आहे.

जाणून घ्या कोणत्या शहरात पेट्रोल दर किती आहे?

दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे.

लखनौमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लिटर आहे.

गांधीनगरमध्ये पेट्रोल ९५.३५ रुपये आणि डिझेल ८९.३३ रुपये प्रति लिटर आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८२.९६ रुपये आणि डिझेल ७७.१३ रुपये प्रति लिटर आहे.

दररोज सकाळी ६ वाजता किंमत बदलते

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आरएसपी आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New rates of petrol and diesel released know how much one liter of petrol is available in your city scsm
First published on: 06-12-2021 at 12:56 IST