New Rules from Today : आजपासून सर्वसामान्यांशी संबंधित ‘या’ पाच गोष्टींमध्ये झाला आहे बदल….

आजपासून सर्व लोकांच्या जीवनात अनेक बदल होणार आहेत. याचा परिणाम सामान्य जनजीवनावर होणार आहे. हे बदल किचनमधल्या माचिस बॉक्स ते घरगुती गॅस सिलिंडर आणि क्रेडिट कार्ड ते बचत खात्यावरील व्याज दरा अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.

New-Rules-from-1st-December-2021
(सांकेतिक फोटो)

New Rules from 1st December 2021 : आजपासून सर्व लोकांच्या जीवनात अनेक बदल होणार आहेत. याचा परिणाम सामान्य जनजीवनावर होणार आहे. बँकिंगपासून अगदी EPFO आणि किचनशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल किचनमधल्या माचिस बॉक्स ते घरगुती गॅस सिलिंडर आणि क्रेडिट कार्ड ते बचत खात्यावरील व्याज दरा अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. हे नवीन नियम सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार आहेत आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड
भारतातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आजपासून EMI व्यवहारांवर प्रक्रिया शुल्क आकारत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आजपासून मासिक हप्ता (EMI) किंवा इतर व्यवहाराचे EMI मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रक्रिया शुल्क आकारणार आहे. EMI व्यवहारांसाठी SBI क्रेडिट कार्डधारकांना खरेदीवरील स्वतंत्रपणे करासह आता आणखी ९९ रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.

पंजाब नॅशनल बँकेचे बचत ठेव व्याज दर
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) बचत ठेवींवरील व्याजदरात कपात केल्याने लहान बचत खातेदारांचा उत्साह कमी झाला आहे. PNB ने बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदर १० लाख रुपयांच्या खाली असलेल्या खात्यासाठी १० बेस पॉईंट्स (bps) आणि १० लाख व त्यावरील खात्यातील शिल्लक रकमेसाठी ५ बेस पॉइंट्स (bps) कमी करून अनुक्रमे २.८० टक्के वार्षिक आणि २.८५ केला आहे. हे नवीन व्याजदर आजपासून लागू झाले आहेत.

पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र
८० वर्षांवरील सेवानिवृत्तांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र देशातील कोणत्याही मुख्य पोस्ट ऑफिसमधील जीवन सन्मान केंद्रात सादर करता येईल. हे प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ ही निश्चित करण्यात आली होती. हे जीवन प्रमाणपत्र म्हणजे पेन्शनधारक अजूनही जिवंत असल्याचा पुरावा आहे. तुम्ही याचे पालन न केल्यास तुमचे पेन्शन संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमच्या पेन्शनवर परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा : Solar Eclipse 2021 : 2021 चे शेवटचे सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे? घरबसल्या पाहता येणार

१४ वर्षांनंतर सामन्यांच्या किमती वाढल्या
वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने आगपेटीच्या किंमती १४ वर्षांनंतर वाढल्या आहेत. आजपासून आगपेटींची किरकोळ किंमत सध्याच्या १ रुपये वरून २ रुपये झाली आहे. २००७ मध्ये या किंमती ५० पैशांवरून १ रुपये प्रति बॉक्सपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या.

व्यावसायिक गॅस सिलिंडरची दरवाढ
डिसेंबर महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलेली नाही, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत ही वाढ १०३.५० रुपये झाली आहे. त्यानंतर गॅस सिलेंडरची किंमत २१०१ रुपये झाली आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New rules from today credit card savings a c to pension 5 major rules changing from december 1 prp

ताज्या बातम्या