अनेकांना ऑफिसचे काम नाइट शिफ्टमध्ये करावे लागते. या शिफ्टमुळे आपल्या जीवनशैलीत खूप बदल होतो, आपल्या झोपण्याची वेळ बदलते, खाण्याच्या सवयींकडे लक्ष देऊ शकत नाही. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कॉर्पोरेट संस्कृतीमुळे ही नाइट शिफ्ट संकल्पना मोठ्या प्रमाणात वाढतेय. यात बहुतेकांना रात्री उशिरापर्यंत काम सुरू ठेवावे लागते आणि सकाळी लवकर डेस्क सोडावा लागतो. यामुळे मित्रांना भेटणे आणि समाजात राहण्याचा इतका त्रास वाटत नसला तरी रात्रभर काम करून शरीर खूप थकते. यामुळे किती ठरवूनही तुम्हा दिवसभर फ्रेश राहू शकत नाही.

रात्रीच्या वेळी शरीरात विविध बदल होत असतात यात विश्रांती नसल्यामुळे बहुतेक झोपेमुळे होणारी कार्ये बिघडतात. यामुळे आरोग्याशी संबंधित आजार वाढतात. पण आपल्या जीवनशैलीत बदल करून आपण विविध आजारांना टाळू शकतो. यामुळे नाइट शिफ्टमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण नेमके काय केले पाहिजेत. हे आज सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी या व्हिडीओमध्ये नाइट शिफ्टमध्ये काम करताना तीन महत्त्वाच्या टिप्सबद्दल सांगितले आहे. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता.

तज्ज्ञांच्या मते, ‘रात्रीच्या शिफ्टमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि तुमचे चयापचय, हार्मोन्स, पचन आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. परंतु आपण स्वत:ची काळजी घेऊन संभाव्य आरोग्यासंबंधित धोके टाळण्यासाठी काही गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकता.

१) बाजरीचे पदार्थ खा.

उठल्यावर बाजरीची भाकरी किंवा त्यापासून बनवलेले पौष्टिक पदार्थ खा. याशिवाय राजगिरा, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खाऊ शकता, यामुळे तुम्हाला रात्री सोडा, चिप्स किंवा फास्ट फूड खाण्याची इच्छा होणार नाही.

ना उन्हाचा तडाखा, ना पावसाची भीती, तयार केला असा देसी जुगाड; vidoe पाहून युजर्स म्हणाले, काका तुम्ही…

२) ऑफिसमध्ये चहा किंवा कॉफी घेऊ नका.

बहुतेक लोकांना चहा किंवा कॉफी कपाने शिफ्ट सुरू करण्याची सवय असते. तज्ज्ञांच्या मते, तुमची नाइट शिफ्ट चहा किंवा कॉफीने सुरू केल्याने डिहायड्रेशन आणि गॅसची समस्या जाणवेल. यामुळे पित्ताची समस्या, मळमळ, चिडचिड आणि पोटात गोळा अशा समस्या उद्धवण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ताक किंवा सरबत प्या. यानंतर तुम्ही नाइट शिफ्ट संपून घरी येता, तेव्हा झोपण्याआधी केळी, आंबा ( उन्हाळ्यात) किंवा गुलकंद हा दूध किंवा पाण्यात टाकून प्या. जेणेकरून डिहायड्रेशन किंवा पोट फुगण्याची समस्या जाणवणार नाही.

३) सूर्यनमस्कार घाला.

तुम्ही शरीराची स्थिती आणि मणक्याच्या लवचिकतेसाठी तीन सूर्यनमस्कार घाला. यामुळे तुमचे शरीर थोडे हलके होईल.