एनआयआरएफ इंडिया रँकिंग २०२१ ची यादी (NIRF Ranking 2021 List)जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यादी जाहीर करताना याबाबतचं ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये धर्मेंद्र प्रधान म्हणतात की, “मी आणि माझे सहकारी अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार आणि डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कद्वारे स्थापित इंडिया रँकिंग २०२१ यादी  जाहीर केली आहे. यंदा रँकिंग फ्रेमवर्कमध्ये ६,००० संस्थांनी सहभाग घेतला याचा आम्हाला आनंद आहे.”

भारतातील अव्वल महाविद्यालये आणि विद्यापीठांची यादी एकूण ११ श्रेण्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विद्यापीठं, व्यवस्थापन, महाविद्यालयं, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूट ऑन इन्होव्हेशन अचिव्हमेंट (ARIIA २०२१), कायदा आणि संशोधन संस्था आणि ओव्हरऑल या श्रेणींचा समावेश आहे. आपण अधिकृत वेबसाइट nirfindia.org वर संपूर्ण यादी तपासू शकता. दरम्यान, श्रेणीनुसार भारतातील सर्वोत्तम विद्यापीठं आणि महाविद्यालयं कोणती आहेत जाणून घेऊया.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनआयआरएफ २०२१ यादी: श्रेणीनुसार अव्वल महाविद्यालये आणि विद्यापीठे

  • ओवरऑल – आयआयटी मद्रास (IIT Madras)
  • विद्यापीठ – आयआयएससी बंगलोर (IISc Bangalore)
  • अभियांत्रिकी – आयआयटी मद्रास (IIT Madras)
  • व्यवस्थापन – आयआयएम अहमदाबाद (IIM Ahmedabad)
  • फार्मसी – जामिया हमदर्द (Jamia Hamdard)
  • महाविद्यालय – मिरांडा हाउस (Miranda House)
  • मेडिकल – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नवी दिल्ली (AIIMS New Delhi)
  • लॉ – एनएलएसआययू बेंगलुरु (NLSIU Bengaluru)
  • आर्किटेक्ट – आयआयटी रुड़की (IIT Roorkee)
  • डेंटल – मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल साइंसेज, उडुपी
  • रिजर्च – आयआयएससी बैंगलोर (IISc Bangalore)