Nitin Gadkari Pune Special Batata Wada Recipe: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्ट भाषणे, बोलण्याची शैली , हसतमुख चेहरा व खाण्यावरील प्रेम या गोष्टींमुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. अगदी विरोधकांपासून ते विरोधी पक्षांच्या समर्थकांनी सुद्धा अनेकदा गडकरी यांच्या कामाच्या शैलीचे कौतुक केले आहे. गडकरी यांनी यापूर्वी स्वतःच्या युटूयब चॅनेलवर तसेच अनेक मुलाखतींमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील त्यांच्या आवडत्या पदार्थांविषयी भाष्य केले आहे. मुंबईतील शाहरुख खानच्या घराजवळील ताज हॉटेलमध्ये चायनीज असो किंवा दिल्लीतील चाट गडकरी यांची खाण्यातील आवड सुद्धा शंभर नंबरी आहे. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत पुण्यातील प्रसिद्ध प्रभात हॉटेलच्या बटाटा वड्याचं कौतुक केलं आहे. त्यांना हा वडा इतका आवडला की त्यांनी ती रेसिपी आणून आपल्या घरात सुद्धा बनवायला सांगितली आहे.

कर्ली टेल्सच्या कामिया जानीसह मुलाखतीत गडकरी यांनी पुण्याच्या प्रभात येथील बटाटवड्याची रेसिपी सांगितली आहे. ही नेहमीपेक्षा थोडी हटके व वेगळे रेसिपी आहे आणि सगळ्यांनी ती नक्की ट्राय करून पाहावी असेही गडकरी यांनी म्हटले आहे. नक्की ही रेसिपी काय आहे हे पाहूया, गडकरी सांगतात की..

१) सर्वात आधी तुम्हाला बटाटे उकडून घ्यायचे आहेत.
२) उकडलेले बटाटे एका ताटात कुस्करून घ्या.
३) यामध्ये लिंबाचा रस (आवडीनुसार), सैंधव मीठ (काळे मीठ) , साखर टाका
४) यामध्ये आलं लसणाची पेस्ट किंवा बारीक तुकडे करून टाका
५) कांदा अगदी बारीक चिरून या मिश्रणात घाला
६) मिरची थोडी जाडसर व कोथिंबीर बारीक चिरून हे सगळं एकत्र करून घ्या.
७) नेहमीप्रमाणे बेसनात घोळवून वडे तळून घ्या.

हे ही वाचा << Video: अर्धा कप मूगडाळीने बनवा चटपटीत ‘राम लड्डू’, चटणीमध्ये वापरा ‘हे’ सिक्रेट, एकदा करून पाहाच

नितीन गडकरी सांगतात की, हा वडा विना हळद व मसाले घालता सुद्धा इतका कमाल लागतो की त्यांनी स्वतः मोठाले तीन वडे खाल्ले होते. तुम्हीही ही रेसिपी एकदा नक्की करून पाहता व कशी होते हे कमेंट करून कळवा.

Story img Loader