रेबीज हा जीवघेणा आजार असून तो प्रामुख्याने श्वानांमुळे होतो असा लोकांचा समज आहे. मात्र केवळ श्वानच नव्हे तर काही इतर प्राण्यांमुळे देखील रेबीज होऊ शकतो. रेबीज हा विषाणूजन्य आजार असून तो प्राण्यांनी चावल्यामुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांवर रेबीज आढळतो. 95 टक्क्यांपेक्षा जास्त मानवी मृत्यू आशिया आणि आफ्रिका प्रदेशात होतात. रेबीज काय आहे, आणि तो कोणत्या प्राण्यांमुळे होतो, तसेच या आजाराची लक्षणे काय, याबाबत आज आपण जाणून घेऊया.

काय आहे रेबीज?

रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे. रेबीज प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. हा विषाणू प्राण्यांच्या लाळेत आढळतो. जेव्हा प्राणी मनुष्याला चावतो तेव्हा हा विषाणू शरीरात शिरतो आणि मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते. रेबीज विषाणू हा डोक्यात शिरल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो.

ही आहेत रेबीजची लक्षणे

रेबीजची लक्षणे काहीवेळा फार उशीराने लक्षात येतात, असे तज्ज्ञ सांगतात. पण तोपर्यंत उपचार कठीण होऊ शकते. रेबीज असलेला प्राणी चावल्यानंतर रुग्णांमध्ये पुढील लक्षणे दिसून येतात.

  • ताप
  • डोकेदुखी
  • उल्टी येणे
  • भिती वाटणे
  • चिंतेत राहाणे
  • विषाणू चेतासंस्थेत शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणे.
  • रुग्णाचे वागणे बदलते, त्याला पाण्याची भिती वाटू लागते.
  • हायपर अ‍ॅक्टिव्हिटी
  • झोप न येणे
  • शरीरातील कुठलाही भाग पॅरेलाईज होणे.
  • भ्रम होणे

कोणत्या प्राण्यांपासून पसरतो रेबीज?

रेबीज सर्वात अधिक श्वानांपासून पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रेबीजमुळे मानवाच्या मृत्यूला सर्वाधिक श्वान जबाबदार आहे. यात श्वानांचा वाटा ९९ टक्के इतका आहे. पण श्वानांव्यतिरिक्त पुढील प्राण्यांनी चावल्यास देखील रेबीज होऊ शकतो.

१) वटवाघूळ
२) बीवर
३) कायोटी
४) माकड
५) रेकून
६) स्कंक
७) वुडचुक्स
८) मांजर

रेबीज असलेले प्राणी चावल्यावर काय करावे?

रेबीज असेलेले प्राणी तुम्हाला चावल्यास तातडीने डॉक्टरला दाखवा. प्राण्याने चावल्याच्या ७२ तासांच्या आत अँटी रेबीज लस घेणे गरजेचे आहे. ७२ तासांनंतर लस घेतल्यास कदाचित ती रेबीज विरोधात फार फायदेशीर ठरणार नाही. त्याचबोरबर, पाळीव प्राण्याला जरी रेबीजची लस दिली असली तरी तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवे. रेबीजसाठी आधी १४ इंजेक्शन लागायचे, मात्र आता ५ इंजेक्शन दिले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)