यावर्षी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आझादी का अमृत महोत्सव म्हणून यंदा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. यासाठी जय्यत तयारीही करण्यात येत आहे. संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत घराघरात देशाचा झेंडा फडकावण्याचा उपक्रम सुरु आहे. तब्बल १५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही. भारताव्यतिरिक्त असे अन्य ४ देश आहेत जे १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. या देशांनाही १५ ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य मिळालं होतं.

  • बहरीन

बहरीन लोकसंख्येच्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वेक्षणानंतर देशाने ब्रिटिशांपासून आपले स्वातंत्र्य घोषित केले. यानंतर देशाने ब्रिटनशी मैत्रीचा नवा करार केला. बहरीनला ब्रिटनकडून १५ ऑगस्ट १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं.

Independence Day 2022: स्वातंत्र्य दिनासाठी ट्राय करा ‘हे’ पारंपरिक तिरंगी रेसिपीज; फूड कलरची गरजच नाही

  • उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया

कोरियाचा राष्ट्रीय मुक्ती दिवस हा दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांमध्ये दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांकडून कोरियन द्वीपकल्प मुक्त झाल्यानंतर, तीन वर्षांनंतर, १५ ऑगस्ट १९४८ रोजी स्वतंत्र कोरियन सरकारे निर्माण झाली.

  • काँगो

१९६० मध्ये या देशाला फ्रान्सपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. काँगो देश १५ ऑगस्ट रोजी त्याचे स्वातंत्र्य साजरे करते, जो कांगोचा राष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • लिकटेंस्टाईन

जगातील सर्वात लहान देशांपैकी एक, लिकटेंस्टीनने १८६६ मध्ये जर्मन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले. १९४० पासून १५ ऑगस्ट रोजी या देशात राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. ५ ऑगस्ट, १९४० रोजी लिकटेंस्टीनच्या प्रिन्सिपॅलिटीच्या सरकारने अधिकृतपणे १५ ऑगस्टला देशाची राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केले.