आता Apple AirPods Pro तीन वर्षांसाठी मोफत दुरुस्ती किंवा बदलले जाऊ शकणार! जाणून घ्या अधिक तपशील

हे Apple AirPods Pro एका वेळच्या चार्जिंगमध्ये सुमारे साडेचार तास चालतात.

AirPods-Reuters
ही मुदत आता त्यांच्या विक्रीनंतर तीन वर्षांची करण्यात आली आहे. (फोटो: Reuters)

अमेरिकन बहुराष्ट्रीय टेक कंपनी अॅप्पलने आपल्या एयरपॉड्स प्रोवर रिपेयर प्रोग्रामची वैधता वाढवली आहे, ज्यात नॉइस कैंसिलेशन किंवा आवाज स्थिरीकरणाची क्षमता आहे. या प्रोग्रामअंतर्गत प्रभावित वापरकर्ते त्यांच्या एअरपॉड्स प्रोची दुरुस्ती किंवा पुनर्स्थापना विनामूल्य दोन वर्षांच्या आत कधीही करू शकत होते, परंतु नवीनतम विस्तारासह, ही मुदत आता त्यांच्या विक्रीनंतर तीन वर्षांची करण्यात आली आहे.

अॅप्पलचे सर्वात महागडे इअरबड्स २०१९ मध्ये आल्याच्या एक वर्षानंतर एअरपॉड्स प्रो दुरुस्ती प्रोग्राम मूळतः ऑक्टोबर २०२० मध्ये सादर करण्यात आला. एअरपॉड्स प्रोवरील वॉरंटी कालबाह्य होत असताना अॅप्पलची घोषणा करण्यात आली. तथापि, विस्तारासह, २०१९ मध्ये खरेदी केलेले एअरपॉड्स प्रो आता ऑक्टोबर २०२२ पर्यंत कव्हर केले गेले आहेत, तर ज्यांनी नंतर ते खरेदी केले त्यांना अधिक वर्षांसाठी कव्हरेज असेल.

(हे ही वाचा: नेहमीची मिठाई खाऊन कंटाळा आलाय? मग ‘मोतीचूर चीजकेक’ची रेसिपी नक्की करा ट्राय)

अॅप्पलने आपल्या वेबसाइटवर नमूद केले आहे की प्रभावित युनिट ऑक्टोबर २०२० मध्ये तयार केले गेले होते, त्यामुळे नवीन एअरपॉड्स प्रोमध्ये या समस्या येण्याची शक्यता कमी आहे. तरीही इन्व्हेंटरीमुळे तुमचे एअरपॉड्स प्रो युनिट येण्याची शक्यता आहे. अॅप्पल तुम्हाला डाव्या, उजव्या किंवा दोन्ही इअरबड्ससाठी मोफत दुरुस्ती किंवा बदलण्याची ऑफर देत आहे.

तुम्ही तुमच्या एअरपॉड्स प्रो ची ‘सेवा’ करण्यासाठी जवळच्या अॅप्पल अधिकृत सेवा प्रदात्यास भेट देऊ शकता. एअरपॉड्स प्रोची चाचणी केल्यानंतरच मोफत प्रोग्राम अंतर्गत सेवा दिली जाईल. आपल्याला हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की हा प्रोग्राम एअरपॉड्स प्रोची वॉरंटी वाढवत नाही. म्हणजेच, आपले युनिट खरेदी केल्यानंतर तीन वर्षांचा प्रोग्राम लगेच सुरू होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Now apple airpods pro can be repaired or replaced for free for three years learn more details ttg

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या