Royal Enfield ने लाँच केलं खास अ‍ॅप, घरबसल्या बूक करा बुलेट; ‘रोडसाइड असिस्टन्स सर्व्हिस’ही मिळेल

रॉयल एनफील्ड बुलेट खरेदी करायची असेल तर कंपनीच्या डीलरशिपमध्ये जाण्याची गरज नाही

बुलेट बनवणाऱ्या रॉयल एनफील्डने भारतात एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच केलं आहे. लाँचिंगसोबतच कंपनीचं हे नवीन अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्म्ससाठी उपलब्ध झालं आहे.

या अ‍ॅपद्वारे युजर्सना रॉयल एनफील्डच्या राइड्स व इव्हेंट्ससाठी नोंदणी करता येईल. याशिवाय या अ‍ॅपच्या मदतीने कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये बाइकची सर्व्हिसिंगही बूक करता येईल. गाडीच्या छोट्या-मोठ्या समस्या स्वतःच दुरूस्त करण्याबाबत यामध्ये माहिती देण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे तातडीने रोडसाइड असिस्टेन्ससाठीही संपर्क साधता येतो. मुख्य म्हणजे या अ‍ॅपमुळे जर तुम्हाला रॉयल एनफील्ड बुलेट खरेदी करायची असेल तर कंपनीच्या डीलरशिपमध्ये जावं लागत नाही. अ‍ॅपद्वारेच तुम्ही नवीन बुलेट बूक करु शकतात.

आणखी वाचा  :- (Bajaj Pulsar चौथ्या क्रमांकावर, सर्वाधिक विक्री झालेल्या ‘या’ आहेत टॉप 10 बाइक्स)

सध्या बाजारात कंपनीकडून एकूण पाच बाइकची विक्री सुरू आहे. यामध्ये बुलेट, क्लासिक, हिमालयन, इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 यांचा समावेश आहे. दरम्यान, करोना महामारीमुळे ज्या ग्राहकांना जवळच्या वर्कशॉपमध्ये जाऊन सर्व्हिसिंग करणं शक्य नाही अशांसाठी कंपनीने यापूर्वीच ‘सर्विस ऑन व्हील्स’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. यानुसार ग्राहकाच्या घरी जाऊन बाइक सर्व्हिसिंगची सेवा दिली जाणार आहे. कंपनीने ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ या सेवेसाठी खास 800 मोटरसाइकल्स देशाच्या विविध डीलरशिप्समध्ये तैनात ठेवल्या आहेत. ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ सेवेनुसार एक मोबाइल सर्व्हिस टीम ग्राहकाच्या घरी जाईल आणि बाइकची पूर्ण सर्व्हिसिंग करेल. या टीमकडे टूल किटसोबत गरज भासल्यास बदलण्यासाठी ओरिजनल स्पेअर पार्ट्सदेखील असतील. कंपनीची मोबाइल टीम बाइकच्या सर्व्हिसिंग लहान-मोठं रिपेअरिंग, इलेक्ट्रिकल दोष, पार्ट्स बदलणं किंवा दुरूस्ती यांसारखी कामं करेल. साधारणपणे ही टीम 80 टक्क्यांपर्यंत सर्व प्रकारची सर्व्हिसिंग करेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी Royal Enfield च्या ग्राहकांना जवळच्या डीलरशिपमध्ये फोनद्वारे संपर्क करावा लागेल. त्यानंतर सर्व्हिसिंगसाठी वेळ आणि दिवस सांगितल्यानंतर मोबाइल टीम घरी येऊन तुमच्या बाइकची सर्व्हिसिंग करेल.

(Bajaj Pulsar चौथ्या क्रमांकावर, सर्वाधिक विक्री झालेल्या ‘या’ आहेत टॉप 10 बाइक्स)

(क्रेटा-सेल्टॉसच्या Turbo पेक्षा 5 लाखांनी ‘स्वस्त’! लाँच झाली ‘पॉवरफुल’ Renault Duster Turbo)

( OFFER : देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कार अजून स्वस्तात खरेदी करण्याची संधी)

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Now book a royal enfield through mobile app royal enfield introduces new mobile app for android ios sas

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
ताज्या बातम्या