Numerology 2022 Rashifal In Marathi: अंकशास्त्रात संख्यांच्या आधारे भविष्य वर्तवले जाते. यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याचे भविष्य कळू शकते. आता नवीन वर्ष सुरू होणार असताना, हे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल, याची उत्सुकता लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत त्याचे परिणाम कसे होतील. नवीन वर्ष तुमच्यासाठी कसे असणार आहे हे तुम्हाला अंकशास्त्राच्या माध्यमातून कळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूलांक १ : ज्या लोकांची जन्मतारीख १, १०, १९ किंवा २८ आहे त्यांचा मूलांक १ असेल. या राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफसाठी नवीन वर्ष खास असणार आहे. प्रेमविवाह होण्याची चांगली शक्यता आहे. हे नवीन वर्ष विवाहितांच्या जीवनासाठी अनुकूल असेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर या वर्षात तुम्हाला खूप नशिबाची साथ मिळेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. काही योजना तुम्हाला चांगले परिणाम देतील.

मूलांक २ : ज्या लोकांची जन्मतारीख २, ११ , २० आणि २९ आहे त्यांचा मूलांक २ असेल. या वर्षी तुमची भावनिकता शिखरावर असेल. वैवाहिक जीवनातील या भावनिकतेमुळे जोडीदाराला त्रास होऊ शकतो. नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना या वर्षी चांगले परिणाम मिळतील. तुम्ही पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत राहील.

मूलांक ३ : ज्या लोकांच्या जन्मतारीख ३, १२, २१ आणि ३० आहेत त्यांचा मूलांक क्रमांक ३ असेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या औदार्यामुळे या वर्षी खूप त्रास सहन करावा लागू शकतो. जोडीदाराशी संबंध बिघडू शकतात. प्रेमप्रकरणांसाठी वर्षाची सुरुवात चांगली राहील. प्रेमविवाहाचे योग आहेत. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यवसायात विस्तार करू शकाल. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.

मूलांक ४ : ज्या लोकांची जन्मतारीख ४, १३, २२ आणि ३१ आहे त्यांचा मूलांक क्रमांक ४ असेल. या अंकाच्या लोकांसाठी नवीन वर्ष चांगले राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल. तुम्हाला जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना या वर्षी मोठे पद मिळू शकते. पदोन्नतीची जोरदार शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यापारी वर्गासाठीही हे वर्ष खूप फायदेशीर ठरणार आहे.

आणखी वाचा : Happy New Year 2022 Wishes In Marathi : नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीतील खास Whatsapp Messages, Quotes, SMS, Status

मूलांक ५ : ज्या लोकांच्या जन्मतारीख ५, १४ आणि २३ आहेत त्यांचा मूलांक ५ असेल. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष चांगले जाईल. तुमची सर्व कामे होतील. करिअरमध्येच चांगले यश अपेक्षित आहे. प्रेमसंबंधित प्रकरणांमध्ये चढ-उतार होऊ शकतात. वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष अनुकूल राहील. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत कोणताही व्यवसाय करत असाल तर या वर्षी तुम्हाला प्रचंड यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना या वर्षी चांगला फायदा होईल.

मूलांक ६: ज्या लोकांची जन्मतारीख ६, १५ आणि २४ आहे त्यांचा मूलांक ६ असेल. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष शुभ ठरणार आहे. विवाहितांसाठी हे वर्ष चांगले राहील. नोकरी शोधणाऱ्यांना या वर्षी त्यांची प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल. या वर्षी तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला चांगली बढती मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : Skin Care Tips: रात्री झोपताना हे तेल चेहऱ्याला लावा, काही दिवसात चमक येईल

मूलांक ७ : ज्या लोकांच्या जन्मतारीख ७, १६ आणि २५ आहेत त्यांचा मूलांक क्रमांक ७ असेल. नवीन वर्षात तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नवीन वर्ष प्रेमसंबंधित बाबींसाठी कठीण जाण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना वर्षाच्या सुरुवातीला मोठी बढती मिळू शकते. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. हे वर्ष नोकरीत चांगले यश देईल. व्यावसायिकांना थोडे सावध राहावे लागेल.

मूलांक ८ : ज्या लोकांच्या जन्मतारीख ८, १७ आणि २६ आहेत त्यांचा मूलांक क्रमांक ८ असेल. नवीन वर्षाची सुरुवात प्रेमसंबंधित बाबींसाठी चांगली होईल. विवाहित लोकांना त्यांचे वैवाहिक जीवन मधुर बनवण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना या वर्षी थोडे सावध राहावे लागेल. वर्षाच्या मध्यात तुम्हाला तुमच्या नोकरीत काही चांगल्या संधी मिळतील. काही गुप्त योजना यशस्वी होतील. जे तुमच्यासाठी नफा आणि व्यवसाय वाढीचा मार्ग खुला करेल.

आणखी वाचा : Good News For 5 Rashi: ६८ दिवस बुध मकर राशीत राहील, ५ राशींना नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा होईल

मूलांक ९ : ज्या लोकांच्या जन्मतारीख ९, १८ आणि २७ आहेत त्यांचा मूलांक क्रमांक ९ असेल. या राशीच्या लोकांना नवीन वर्षात त्यांच्या करिअरमध्ये बळ मिळेल. वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशी माध्यमांतूनही तुम्हाला चांगले काम मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या, वर्षाची सुरुवात उत्कृष्ट असेल आणि तुम्हाला अनेक मार्गांनी पैसे मिळू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerology horoscope 2022 know from your birth date how will the new year 2022 prediction for mulank be for you prp
First published on: 30-12-2021 at 21:48 IST