आहाराचे नियोजन किंवा व्यायाम केल्यानेदेखील झपाटय़ाने वाढणारे वजन कमी होत नसेल तर जगभरात वेगाने पसरणाऱ्या लठ्ठपणाच्या या समस्येविरोधात संशोधकांनी असा अंश शोधून काढला आहे. ज्यामुळे या समस्येपासून काही अंशी दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
या वेळी संशोधकांनी एका उंदरावर प्रयोग करताना हा अंश ग्रहण केल्याने या प्राण्याच्या शरीरातील अतिरक्त वजन कालांतराने कमी झाल्याचे दिसून आले. यासाठी शरीरातील आनुवंशिक घटकदेखील मदतशीर ठरतात. कारण शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट करण्यासाठी आहाराचे नियोजन हे जरी काही लोकांसाठी गुणकारक ठरत असले तरी अशा प्रकारच्या उपचारांमधून घडणारे वर्तवणुकीतील बदल जे सर्वसाधारण लोकसंख्येला दीर्घ काळ करणे शक्य नसल्याचे स्पष्टआहे.
संशोधकांना असे आढळून आले की, शरीरातील एस आर प्रोटीन, एसआरएसएफआयसारख्या छोटय़ा अंशामुळे लठ्ठपणा वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या आहारामुळे उंदराच्या शरीरातील अतिरिक्त वजन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. एसआरएसएफआय या घटकाला प्रतिबंधित केल्यास लठ्ठपणा वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना रोखणे सहज शक्य आहे. हे संशोधन लठ्ठपणावर आधारित आंतरराष्ट्रीय जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)