अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वन प्लस 8 प्रो 5G (OnePlus 8 Pro 5G) या स्मार्टफोनची अखेर भारतात विक्री सुरू होणार आहे. आज(दि.15) या फोनच्या विक्रीसाठी पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी या फोनसाठी 29 मे रोजी सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, करोना व्हायरसमुळे  मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद झाल्यानंतर तो सेल पुढे ढकलण्यात आला. अखेर आज दुपारी 12 वाजेपासून या फोनच्या सेलला अ‍ॅमझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरूवात होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑफर :-
सेलमधून OnePlus 8 Pro 5G खरेदी करणाऱ्यांसाठी काही ऑफरही आहेत. एसबीआयच्या कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 3,000 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय जिओच्या ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंतच्या जिओ बेनिफिट्सची ऑफर आहे. तसेच ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल.

OnePlus 8 Pro स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :-
OnePlus 8 Pro स्मार्टफोनमध्ये HDR10+ सपोर्ट आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह 6.78 इंचाचा QHD+ Fluid AMOLED डिस्प्ले आहे. लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह या फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात एक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, दुसरा 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे. याशिवाय, 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा कलर फिल्टर लेंसही आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. अँड्रॉइड 10 आधारित OxygenOS वर कार्यरत असणाऱ्या या फोनमध्ये 4510mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रामरीन ब्लू, ऑनिक्स ब्लॅक आणि ग्लेशियल ग्रीन अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे. तर, 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oneplus 8 pro to go on sale in india via amazon oneplus site get price in india specifications and offers sas
First published on: 15-06-2020 at 11:01 IST