चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपल्या F11 Pro या स्मार्टफोनचं एक नवीन व्हेरिअंट बाजारात आणलं आहे. ‘वॉटरफॉल ग्रे’ या नव्या रंगामध्ये हे नवं व्हेरिअंट लाँच करण्यात आलं असून ‘अॅमेझॉन प्राईम डे’ सेलमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. 23 हजार 990 रुपये इतकी या नव्या व्हेरिअंटची किंमत आहे. सेलमध्ये हा फोन एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 10 टक्के सवलत देखील मिळेल. याशिवाय जुना फोन देऊन एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात.

F11 प्रो या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रायमरी रिअर कॅमेरा तब्बल 48 मेगापिक्सल आहे. तर 12 मेगापिक्सलचा सेंकडरी सेंसर कॅमेरा आहे. याचा सेल्फी कॅमेरा पॉप-अप आहे. हा 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार आहे. Oppo F11 Pro हा स्मार्टफोन Mediatek Helio P70 प्रोसेसरनुसार चालणार आहे. याची बॅटरी 4,000 mAh आहे. 15 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या फोनचा डिस्प्ले 6.5 इंचांचा एलसीडी आहे. इतर फोनप्रमाणे याला फिंगर प्रिंट सेंसरही देण्यात आले आहे.

-6.5इंचाचा एचडी प्लस पॅनारोमिक डिस्प्ले
-पी 70 ऑक्टा-कोर प्रोसेसर
– 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटर्नल मेमरी आहे. मायक्रो एसडी कार्डच्या आधारे ही मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. –
– 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा
-रिअर कॅमेरा 48 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल सेकेंडरी ड्यूअल कॅमेरा
– बॅटरीची क्षमता 4020 एमएएच