scorecardresearch

Premium

मुलं भाज्या खात नाहीत ? हे उपाय करुन पाहा

एक खास रेसिपी

easy vegetable Recipe tips and options
मुले भाज्या खात नसतील तर काही वेगळे पदार्थ बनविता येतात.

मुलं भाज्या, पालेभाज्या खात नाहीत अशी तक्रार तमाम आईवर्गाकडून हमखास केली जाते. खरंतर अगदी लहान वयापासून भाज्या खायची सवय लावायला हवी. घरातील सर्वांनी सर्व प्रकारच्या भाज्या आवडीने खाव्यात, मुलं मोठ्यांचं अनुकरण करतच शिकतात. भाज्यांविषयी सकारात्मक, चांगली चर्चा केली तर मुलंही भाज्या खाऊन बघतील आणि हळुहळु आवड तयार होईल. मात्र इतके सगळे करुनही मूल भाजी खात नसेल तर या काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात…

१. घरातील कोणालाच भाजी आवडत नाही म्हणून त्याऐवजी गूळ तूप, साखरांबा, मुरांबा किंवा लोणचं, चटणी बरोबर पोळी खायची सवय असू नये.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?

२. काही भाज्या मुलांना का आवडत नाहीत या विषयी मुलांशी बोला. भाजी बनवण्याची पध्दत, वापरलेले मसाले, भाजीत घातलेले इतर घटक कशात बदल हवाय विचारून घ्या.

३. भाजी कधी परतून/ कधी वाफवून/ कधी उकडून/ कधी भाजून/ कधी उकळवून करून बघा.
मसाल्यांमध्ये विविधता- गोडा मसाला/ कांदा लसूण मसाला/ पंजाबी मसाला/ पावभाजी मसाला/ किचन किंग मसाला/ गरम मसाला किंवा इतर मसाले वापरून बघा.

४. Continental मिक्स हर्ब्स/ ओरिगानो/ रोजमेरी/ चायनीज शेजवान सॉस/ सोया सॉस/ चिली सॉस किंवा इतर सॉस वापरून बघा.

५. सर्व प्रयत्न करूनही काही भाज्या मुलं खात नाहीत तेव्हा त्या वेगळ्या स्वरुपात जातील असं बघा. भाज्या घालून कटलेट/ सामोसा/ ब्रेड रोल/ सॅंडविच/ काठी रोल/ फ्रँकी/ इडली/ वडे/ भजी/ आळू किंवा कोथिंबीर किंवा मेथी वडी/ पराठा/ थेपला/ थालीपीठ/ धपाटे/ भेळ करू शकता.

६. सूप/ पुलाव/ बिर्याणी/ सलाड/ रायता/ खिचडी मधूनही भाज्या जाऊ शकतात.

७. एखाद-दोन भाज्या अगदीच आवडत नसतील तर मात्र आग्रह करू नका.

Recipe – Hot and sour cabbage

साहित्य- कोबी- पाव किलो, गाजर- २ छोटी, फरसबी- ७-८, कांदा- २ छोटे, भोपळी मिरची- १ मोठी, कांद्याची पात- ३-४, हिरवी मिरची- २-३, पुदिना- १५ पाने, व्हिनेगर- दीड चमचा, सोया सॉस- दीड चमचा, टोमाटो सॉस- दीड चमचा, मिरपूड- दीड चमचा, साखर- दीड चमचा, तेल- २ चमचे, मीठ चवीनुसार.

कृती- कोबी लांब चिरून घ्यावा. गाजर, फरसबी, भोपळी मिरची, हिरवी मिरची सर्व पातळ लांब चिरून घ्यावं. कांद्याची पात चिरावी.

सॉस साठी- कॉनफ्लोअरची पेस्ट तयार करून घ्यावी. पॅनमध्ये टोमाटो सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, हिरवी मिरची, चिरलेला पुदिना, मिरपूड, साखर, मीठ घालून ढवळावे. कॉनफ्लोअर पेस्ट आणि थोडे पाणी घालून सॉस २ मिनिटे शिजवून घ्यावं. गॅसवरल दुसऱ्या पॅनमध्ये तेल तापवून, चिरलेल्या सर्व भाज्या मोठ्या गॅसवर भरभर हलवून, अर्ध्या कच्च्या शिजवून घ्याव्यात. तयार सॉस भाजीत घालून २ मिनिटे एकत्र शिजवावं. हॉट एन सार कॅबेज तयार. वेगळ्या प्रकारची कोबीची भाजी मुलं आवडीने खातील.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-07-2017 at 13:14 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×