scorecardresearch

आरोग्य वार्ता : लठ्ठ महिलांना ‘लाँग कोविड’ची शक्यता अधिक

संशोधकांनी सांगितले की, पुरुषांच्या तुलनेत अधिक महिलांना ‘लाँग कोविड’चा त्रास झाला

आरोग्य वार्ता : लठ्ठ महिलांना ‘लाँग कोविड’ची शक्यता अधिक
(संग्रहित छायाचित्र)

लंडन : करोनामुळे गेल्या तीन वर्षांत लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. अद्याप हजारो नागरिक या आजाराबरोबर लढत आहेत. अशा स्थितीत ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ईस्ट अ‍ॅग्लियाच्या (यूईए) शास्त्रज्ञांचे संशोधन महत्त्वाचे ठरते.

पुरुषांच्या तुलनेत अधिक वजन असलेल्या महिलांना श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, स्मरणशक्तीसंबंधी समस्या आणि चिंता या ‘लाँग कोविड’ म्हणजेच दीर्घकालीन कोविड लक्षणांचा त्रास होण्याची शक्यता असते, असे या शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे स्पष्ट झाले आहे.

पीएलओएस ग्लोबल पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनामध्ये करोनामधून लवकर बरे झालेल्या रुग्णापेक्षा अधिक काळ लक्षणे असणाऱ्या रुग्णांना अतिरिक्त आणि सातत्याने काळजी घेणे आवश्यक असते. ‘यूईए’च्या प्रा. वैसिलीयोस वासिलीउ यांनी सांगितले की, लाँग कोविड ही एक गुंतागुंतीची स्थिती आहे. ही करोना संसर्गादरम्यान किंवा पश्चात निर्माण होते.

संशोधकांनी २०२० मध्ये करोना संसर्ग झालेल्या एक हजार ४८७ रुग्णांचे सर्वेक्षण केले. यामधील ७७४ जणांना किमान एका तरी ‘लाँग कोविड’ लक्षणाचा सामना करावा लागला. संशोधकांनी सांगितले की, पुरुषांच्या तुलनेत अधिक महिलांना ‘लाँग कोविड’चा त्रास झाला. तसेच लठ्ठ महिलांचे यामध्ये प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 03:15 IST

संबंधित बातम्या