scorecardresearch

Premium

हस्तरेखाशास्त्र: तळहातावर ‘H’ चे चिन्ह असेल तर मिळते अमाप संपत्ती, तुमच्या हातावरही आहे का?

शास्त्रानुसार हस्तरेखावर ‘H’ ची निर्मिती अत्यंत शुभ मानले जाते. हा ‘H’ तीन ओळींच्या मदतीने तयार होतो.

Palmistry If you have H sign on your palm
हस्तरेखाशास्त्र

हाताच्या रेषा भविष्य सांगतात आणि या रेषांपासून बनवलेल्या आकृत्या किंवा त्यांच्यावर बनवलेल्या खुणा अनेक शुभ आणि अशुभ संकेत देतात असं मानलं जात. हे आकडे-गुण सांगतात की एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात किती यशस्वी होईल, त्याचं नशीब कसं असेल. आज आपल्याला अशा आकृतीबद्दल माहिती घेत आहोत, जी हातावर असणे अत्यंत शुभ आहे.

शास्त्रानुसार हस्तरेखावर ‘H’ ची निर्मिती अत्यंत शुभ मानले जाते. हा ‘H’ तीन ओळींच्या मदतीने तयार होतो. म्हणजेच, हृदयाची रेषा, नशीब रेषा आणि मेंदूची रेषा एकत्र आल्यास ‘H’ तयार होतो. ज्या लोकांच्या हातात हा ‘H’ असतो, त्यांचा खरा आनंद,सुख वयाच्या ४० व्या वर्षी मिळते. त्यांच्या आयुष्यात एक मोठा आणि आनंददायी बदल येतो आणि ते प्रचंड प्रगती करतात. जीवनाचा हा बदल इतका मोठा आणि चांगला असतो की त्यांना स्वतःच्या नशिबावर विश्वास नाही.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

(हेही वाचा: ‘या’ राशीच्या मुली मानल्या जातात अत्यंत बुद्धिमान, त्यांच्या करियरमध्येही खूप वेगाने करतात प्रगती)

जीवनात भरपूर संपत्ती आहे

हे लोक वयाच्या ४० व्या वर्षात पोहोचताच तेव्हा त्यांच्याकडे अमाप संपत्ती येते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळू लागते, असे न म्हणता हात टाकताच काम पूर्ण होते असं म्हटल तरी ठीक आहे.  तर वयाच्या चाळीशीपूर्वी त्यांना त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी कठोर संघर्ष करावा लागतो. त्यांना प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरे जावे लागते. या वेळेपर्यंत त्यांना नशिबाची नगण्य साथ मिळते. हे लोक खूप सकारात्मक आणि मेहनती असल्याने ते देखील हा वेळ चांगला घालवतात. तथापि, खऱ्या अर्थाने, त्यांना त्यांच्या मेहनतीचा, चांगल्या कामांचा लाभ वयाच्या ४० व्या वर्षी मिळतो. या लोकांना आयुष्यात खूप चांगले स्थान मिळते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Palmistry if you have h sign on your palm you will get immense wealth do you also have it on your hand ttg

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×