आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनवी आयुष्याच्या हिताच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांची धोरणं आजच्या काळातही प्रासंगिक मानली जातात. असं मानलं जातं की आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणारी व्यक्ती आपल्या जीवनातील सर्व संकटांवर सहज विजय मिळवते. चाणक्य नीतिमध्ये आरोग्य, संपत्ती आणि जीवनाशी संबंधित अनेक पैलूंवर तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. कौटिल्य या नावाने प्रसिद्ध असलेले आचार्य चाणक्य यांनीही या शास्त्रात लहान मुलांना वाईट सवयींपासून वाचवण्यासाठी काही धोरणं सांगितली आहेत, ज्या प्रत्येक पालकांनी अंगीकारल्या पाहिजेत. जाणून घ्या काय आहेत ती धोरणं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माता शत्रुः पिता वैरी येन बालो न पाठितः ।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये वको यथा ।।

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य सांगतात की, पालकांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी नेहमीच कठोर परिश्रम केले पाहिजेत. जे पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत नाहीत, ते मुलांसाठी शत्रूपेक्षा कमी नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते, मुलांना ज्ञान आणि शिक्षण देणं खूप महत्वाचं आहे, कारण शिक्षणानेच जीवन सोपं बनवता येते. मुलांना ज्ञान व शिक्षण देण्यासाठी पालकांनी कष्टाला घाबरू नये.

लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः ।
तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्नतुलालयेत् ।

या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य स्पष्ट करतात की, त्याहूनही जास्त लाड करणे मुलांसाठी शापापेक्षा कमी नाही. कारण लाड करणारी मुले खूप लवकर चुकीच्या सवयींना बळी पडतात. त्यामुळे पालकांनी मुलांचे जास्त लाड करू नयेत आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू नये.

आचार्य चाणक्य जी मानतात की, मुलांना प्रेम देणं जितकं आवश्यक आहे तितकंच त्यांच्याशी कठोर असणं देखील आवश्यक आहे. कारण योग्य काळजी मुलांना भविष्यातील सर्व संकटांशी लढण्यास सक्षम बनवते. दुसरीकडे, राष्ट्राच्या निर्मितीमध्ये संस्कारी मुलं मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे सध्याच्या काळातही पालकांनी आपल्या मुलांना पात्र बनवण्यासाठी आचार्य चाणक्यजींच्या या धोरणांचा अवलंब केला पाहिजे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents must follow these acharya chanakya niti to make save children from bad habits prp
First published on: 26-10-2021 at 20:18 IST