More Urine Reason: एका निरोगी व्यक्तीला दिवसातून १ ते २ लिटर (१०००-२००० मिली) लघवी होते. जर तुम्ही दररोज सुमारे दोन ते तीन लिटर पाणी किंवा द्रव पदार्थ खाल्ले, तर लघवीचे प्रमाण जास्त असू शकते. एक सामान्य व्यक्ती दिवसातून चार-आठ वेळा लघवी करू शकते, जे सामान्य मानले जाते. रात्री एकदा लघवी करणेदेखील सामान्य आहे; परंतु काही लोक दिवसातून ७-८ वेळेपेक्षा जास्त आणि वारंवार लघवी करतात. जर एखाद्या व्यक्तीला दिवसातून २.५ लिटरपेक्षा जास्त लघवी होत असेल, तर त्याला पॉलीयुरिया म्हणतात, जे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.
वारंवार लघवी होण्याची अनेक कारणे असू शकतात. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. विनोद शर्मा म्हणाले की, जर तुम्हाला वारंवार लघवी करावी लागत असेल, तर तुम्ही प्रथम तुमच्या लघवीची तपासणी करून घ्यावी. चाचणीत कोणत्याही प्रकारचा संसर्ग किंवा आजार आढळल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी वारंवार लघवी होण्याची काही कारणे सांगितली आहेत. वारंवार लघवी होण्याचे कारण काय आहे आणि ते टाळण्यासाठी काय करावे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…
वारंवार लघवी होण्याचे मुख्य कारण म्हणजे यूटीआय… (Frequent-urination Reason)
जर तुम्हाला वारंवार लघवी करावीशी वाटत असेल, तर त्यासाठी यूटीआय किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग जबाबदार असू शकतो. यूटीआय संसर्गामुळे लघवी वारंवार होते आणि जळजळ होते. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा संसर्ग जास्त होतो. जेव्हा ई. कोलाय (E. coli) बॅक्टेरिया मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि संसर्ग करतात तेव्हा यूटीआय होतो. हा संसर्ग मूत्राशय, मूत्रमार्ग व मूत्रपिंडांपर्यंत पोहोचू शकतो.
प्रेग्नन्सीमध्ये मूत्रस्राव जास्त असतो
गरोदर महिला गरोदरपणात जास्त लघवी करतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यात, hCG (मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन) हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे मूत्रपिंडात रक्तप्रवाह वाढतो आणि लघवीचे उत्पादन वाढते. बाळ वाढत असताना मूत्राशयावर दबाव येतो, ज्यामुळे वारंवार लघवी होते.
अतिक्रियाशील मूत्राशयामुळे जास्त स्राव होतो
ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरमुळे वारंवार लघवी करण्याची इच्छा होते आणि लघवीवर नियंत्रण राहत नाही. मूत्राशयात थोडंसंही मूत्र साचलं तरी त्याचे स्नायू लगेच आकुंचन पावू लागतात, ज्यामुळे लगेच लघवी करण्याची गरज वाटते.
प्रोस्टेट ग्रंथीची वाढ
प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळेही वारंवार लघवी होते. ही समस्या पुरुषांमध्ये लघवी वारंवार होण्याचे एक कारण असते. प्रोस्टेट ग्रंथी मूत्राशयाच्या खाली असते आणि ती लघवीच्या नळीभोवती (युरेथ्रा) असते.
डायबेटीसही एक कारण आहे
जेव्हा शरीरात साखरेची पातळी खूप जास्त होते, तेव्हा मूत्रपिंड ती साखर फिल्टर करून लघवीतून बाहेर टाकू लागते. रक्तात साखर जास्त असल्यामुळे फक्त लघवीच जास्त होते, असे नाही, तर तहानही जास्त लागते.
किडनी स्टोनमुळे लघवी जास्त होते
स्टोन जर किडनी किंवा मूत्राशयात अडकला, तर त्यामुळे लघवीच्या प्रवाहावर परिणाम होतो. मग लघवीशी संबंधित त्रास निर्माण होतात.
लघवीचे प्रमाण वाढवणारे पदार्थ
काही औषधे लघवी वाढवणारी असतात, त्यांना डाययुरेटिक्स म्हणतात. अशी औषधे घेतल्याने वारंवार लघवी होते. बीयर, कॉफी व चहा घेतल्यानेसुद्धा लघवी जास्त होते.
लघवीची ही समस्या कशी टाळायची?
- तज्ज्ञांनी सांगितले की, संसर्ग शोधण्यासाठी, तुम्ही प्रथम नियमित चाचणी करून घ्यावी आणि नंतर मूत्र तपासणी (कल्चर टेस्ट) करून घ्यावी. म्हणजे आजार कळू शकतो.
- दिवसभरात जास्त द्रवयुक्त अन्न खा
- कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. कारण- हे पदार्थ लघवी वाढवतात.
- तुम्हाला डायबेटीस असेल, तर रक्तशर्करा सामान्य ठेवा. लक्षणे २-३ दिवसांत कमी झाली नाहीत, तर डॉक्टरांना जरूर दाखवा.
- जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल आणि सगळी चाचणी सामान्य स्वरूपाची आली असेल, तर कीगल व्यायाम करा. कीगल व्यायाम, ज्याला पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजही म्हणतात. पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी हा एक सोपा व्यायाम आहे.