पाळीव प्राण्यांमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते असा अभ्यास समोर आला आहे. तसेच शांत राहण्यासाठी व उपाचारात्मक फायद्यांसाठी यांचा उपयोग होतो.
पाळीव प्राण्यांच्या सततच्या सहवासामुळे तसेच जास्त जवळ असल्याने त्याचे मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक फायदे होतात. इंग्लडमधील मँचेस्टर विद्यापीठातील लेखक हेलन ब्रुक्स यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ज्या मानसिक रुग्णांनी या अभ्यासात आपले मत मांडले त्यांच्या मते पाळीव प्राणी अनेक सकारात्मक भुमिका पार पाडतात. मानसिक रुग्णांना आपला मानसिक आजार स्वीकारण्यास आणि त्याबाबतच्या न्यूनगंडापासून परावृत्त करण्यास मदत करतात असे त्यांचे म्हणणे आहे. ब्रुक्स पुढे म्हणाले, पाळीव प्राण्यांच्या सहवासात कोणत्याही अटीशिवाय मानसिक आधार मिळु शकतो जो कुटुंब व मित्र-मैत्रिणी अथवा नातेवाईकांकडून जो मिळू शकत नाही.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)