गेल्या दोन वर्षात करोना संकटामुळे लग्न सोहळ्यावर परिणाम दिसून आला. त्यानंतर आता लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर लग्नसोहळे उरकले जात आहे. अनेकांचे विवाह जमले असून उत्तम मुहूर्ताच्या शोधात आहेत. येणाऱ्या वर्षात बरेच शुभ मुहूर्त आहेत. वर्ष २०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत अनेक शुभ मुहूर्त आहेत. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • जानेवारी २०२२: या महिन्यात २२, २३, २४ आणि २५ तारखेला लग्न करणे शुभ राहील.
  • फेब्रुवारी २०२२: शुभ मुहूर्त ५,६,७, ९, १०, १८, १९,२० आणि २२ फेब्रुवारीला शुभ मुहूर्त आहे.
  • मार्च २०२२: मार्चमध्ये फक्त दोन शुभ मुहूर्त आहेत. या महिन्याच्या ४ आणि ९ तारखेला लग्न करणे शुभ राहील.
  • एप्रिल २०२२: या महिन्यात १४,१५, १६,१७, १९, २०, २१, २२, २३, २४ आणि २७ तारखेला लग्न होणे शुभ राहील.
  • मे २०२२: मे महिन्यात अक्षय्य तृतीया व्यतिरिक्त ९,१०, ११, १२, १५, १७,१८,१९,२०, २१, २६, २७ आणि ३१ तारखेला लग्न करणे शुभ राहील.
  • जून २०२२: जूनमधील विवाह १, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १३, १७, २३ आणि २४ तारखेला लग्न करणे शुभ राहील.
  • जुलै २०२२: शुभ मुहूर्त जुलैमध्ये ४, ६, ७, ८ आणि ९ तारखेला आहे.
  • नोव्हेंबर २०२२: या महिन्यात २५, २६, २८ आणि २९ तारखेला लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत.
  • डिसेंबर २०२२: वर्षाचा शेवटचा महिना शुभ मुहूर्त १, २, ४, ७, ८, ९ आणि १४ रोजी असेल.

लग्नासाठी सर्वात अनुकूल काळ म्हणजे जेव्हा सूर्य मेष, वृषभ, मिथुन, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीत प्रवेश करतो. याउलट कर्क, सिंह, कन्या, तूळ, धनु आणि मीन राशीत सूर्याचे भ्रमण होत असेल तर विवाह सोहळ्यासाठी काळ चांगला नाही. सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होते. यामध्ये विवाह निषिद्ध मानला जातो. चातुर्मासात जेव्हा भगवान विष्णू चार महिने क्षीरसागरात योगनिद्रात जातात, तेव्हा विवाह विधी करता येत नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plenty of auspicious vivah muhurt 2022 rmt
First published on: 06-12-2021 at 14:43 IST