scorecardresearch

PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळवा मोफत शिलाई मशीन! एक रुपयाही खर्च करायची गरज नाही

या योजनेत गाव आणि शहरातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

PM Free Silai Machine Yojana
प्रातिनिधिक फोटो: Indian Express

PM Free Silai Machine Yojana: पीएम मोफत शिलाई मशीन योजना २०२२ अंतर्गत, महिलांना फक्त अर्ज करणे आवश्यक आहे. ही योजना प्रत्येक राज्यातील ५०,००० महिलांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहे. पीएम मोफत सिलाई मशीन योजना देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी देईल. भारतातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हे एक चांगले पाऊल ठरू शकते. पीएम मोफत शिलाई मशीन योजना २०२२ अंतर्गत, २० ते ४० वयोगटातील महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

योजनेचे उद्दिष्ट

मोफत शिलाई मशीन योजना २०२२ चा मुख्य उद्देश देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे हा आहे. मोफत सिलाई मशिन योजनेद्वारे श्रमिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले उत्पन्न मिळू शकेल. या मोफत शिलाई मशिन योजना २०२२ च्या माध्यमातून कामगार महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा मूळउद्देश आहे. या योजनेमुळे ग्रामीण महिलांच्या स्थितीतही सुधारणा होणार आहे.

मोफत शिलाई मशीन

या योजनेत गाव आणि शहरातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जन्मतारीख, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, दिव्यांगांसाठी अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र आणि विधवांसाठी विधवा प्रमाणपत्र आवश्यक असेल.

अर्ज कसा करायचा?

सर्व प्रथम तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट http://www.india.gov.in वर जा. होम पेजवर, शिवणकामाच्या मोफत पुरवठ्यासाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. अर्जाच्या PDF ची प्रिंट काढा. त्यानंतर त्यात तुमचा तपशील टाका. शेवटी तुम्हाला तुमची कागदपत्रे जोडावी लागतील.

अर्जाची केली जाईल छाननी

अर्ज सबमिट केल्यानंतर, कार्यालयातील अधिकारी तुमच्या पत्राची तपासणी करतील. तपासणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट बघा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm free silai machine yojana for women know more details ttg

ताज्या बातम्या