पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ४.३० वाजता ई-रुपी लाँच करणार आहेत. ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे. पंतप्रधान मोदी नेहमीच डिजिटल उपक्रमांचा वापर करण्याबाबत माहिती देत असतात. तर, लाभार्थ्यांपर्यंत सर्व फायदे लीक-प्रूफ पद्धतीने नेण्यासाठी आतापर्यंत अनेक कार्यक्रम देखील सुरू केले गेले आहेत. ‘ई-रुपी’ हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या UPI प्लॅटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. ई-आरयूपीआय सेवेचे प्रायोजक लाभार्थी आणि सेवा प्रदात्याशी कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने जोडते.

ई-रुपी म्हणजे काय?

E-RUPI हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस साधन आहे. हे एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे, जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर वितरित केले जाते. या वन टाईम पेमेंट यंत्रणेचे वापरकर्ते कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंग प्रवेशाशिवाय सर्व्हिस प्रोव्हाडर व्हाउचर रिडीम करू शकतील.

ई-रुपी हे देखील सुनिश्चित करते की व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस प्रोव्हाडरला पैसे दिले जातील. प्री-पेड असल्याने, सेवा पुरवणाऱ्याला कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन ई-रुपी देते. वेलफेअर सर्व्हिसचे लीक-प्रूफ वितरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल असणार आहे.

येथे वापरु शकता E-RUPI

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, खत अनुदान, इत्यादी योजनांअंतर्गत सेवा पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. खाजगी क्षेत्र देखील आपल्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचा भाग म्हणून या डिजिटल व्हाउचरचा लाभ घेऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi to launch e rupi for digital payments today learn where it can be used abn
First published on: 02-08-2021 at 12:46 IST