गेमिंग फीचर्ससह Poco F3 GT भारतात लाँच: जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Poco F3 GT स्मार्टफोन भारतात लॉंच करण्यात आला आहे. याचबरोबर उत्कृष्ट डिझाईन सोबतच वापरकर्त्यांना गेमिंगचा चांगला अनुभव घेता येणार आहे.

lifestyle
Poco F3 GT हा स्मार्टफोन आता तीन स्टोरेज मॉडेल्स मध्ये लॉंच करण्यात आलाय( Image Source : POCO India )

स्मार्टफोन चाहत्यांसाठी आता पोको कंपनीने त्यांचा गेमिंग स्मार्टफोन ‘Poco F3 GT’ भारतीय बाजारात लॉंच केला आहे. गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉंच करण्यात आलेल्या या स्मार्टफोन मध्ये बरेच शक्तीशाली गेमिंग फीचर्स असून तुम्हाला यात उत्कृष्ट कार्यक्षमता मिळणार आहे. याचबरोबर चांगल्या आवाजाचा स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये एरोस्पेस-ग्रेड अ‍ॅल्युमिनियम अ‍ॅलोय फ्रेम वापरली गेली आहे. तसेच, त्याला एका बाजूला बेव्हलचे तीन लेअर देखील दिले गेले आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना गेमिंगचा उत्कृष्ट अनुभव घेता येणार आहे.

Poco F3 GT: किंमत आणि सेल डिटेल

Poco F3 GT हा स्मार्टफोन आता तीन स्टोरेज मॉडेल्स मध्ये लॉंच करण्यात आलाय. त्यातील ६ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत २६,९९९ रुपये इतकी आहे. ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत २८,९९९ रुपये आहे आणि ८ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत ३०,९९९ रुपये इतकी आहे.

Poco F3 GT स्मार्टफोनचा पहिला सेल Flipkart वर आज पासून सुरू झाला आहे. या पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोनचं वर दिलेलं पहिलं मॉडेल हे २५,९९९ रुपये, तर दुसरं मॉडेल २७,९९९ आणि तिसरं मॉडेल २९,९९९ इतक्या रुपयांत ग्राहकांना खरेदी  करता येणार आहे. एवढेच नव्हे तर २६ जुलै पासून सुरू होणारा दुसर्‍या सेलमध्ये ग्राहकांना पोको कंपनीने हे स्मार्टफोन २६,४९९ रुपये इतके २८,४९९ आणि ३०,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत. यानंतर ९ ऑगस्टपासून ते मूळ किंमतीवरच विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Poco F3 GT चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Poco F3 GT स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच एमोलेड डिस्प्ले असणार आहे. याचा रिफ्रेश १२० हर्ट्ज असेल. हा डिव्हाइस अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२.५ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. या हँडसेटमध्ये साइड-माउटेंड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

Poco F3 GT स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तिसरा २ मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी १२०० प्रोसेसरवर कार्य करणार असून यात अन्य फीचरमध्ये ५,०६५ एमएएचची दमदार बॅटरी आहे, जी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. या व्यतिरिक्त वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poco f3 gt launch in india learn price sale details and features scsm

ताज्या बातम्या