6000mAh बॅटरीचा Poco M3 स्मार्टफोन झाला लाँच, किंमत 15 हजारांपेक्षा कमी

‘पोको’ने भारतात लाँच केला नवीन ‘बजेट’ स्मार्टफोन

पोको कंपनीने आज (दि.2) भारतात आपला नवीन ‘बजेट’ स्मार्टफोन Poco M3 लाँच केला आहे. 6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर हा फोन सेलमध्ये उपलब्ध होईल.

पोको M3 फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :-
या फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले असून डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनही आहे. 6जीबी रॅम आणि 128जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आहे.  फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 48 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसोबत एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आणि एक 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही मिळेल.  512जीबीपर्यंत माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये IR ब्लास्टर, 4G VoLTE , वाय-फायशिवाय अन्य सर्व स्टँडर्ड पर्याय आहेत.

आणखी वाचा- Samsung Galaxy M02 भारतात झाला लाँच, कमी किंमतीत मिळतील दमदार फिचर्स

पोको M3 किंमत :- 6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर, 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poco m3 with qualcomm snapdragon 662 soc and triple rear cameras launched in india check price and specifications sas

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या