आपल्यापैकी बरेच लोक खवय्ये असतात ज्यांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला फार आवडतो. काही खवय्ये असे असतात ज्यांना बाहेरचे चमचचमीत आणि मसालेदार पदार्थ खायला आवडात. तर ही बातमी आहे खास खवय्यांसाठी. ऑस्ट्रेलिया हे एक असं शहर आहे जे नाइटलाइफ आणि वेगवेगळ्या चवदार पदार्थांसाठी ओळखले जाते. जर तुम्ही खाण्यापिण्याचे शौकीन असाल आणि ऑस्ट्रेलियाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला या देशात तुम्हाला खाण्यापिण्यासाठी अनेक चविष्ट पदार्थ खायला मिळतील . जेव्हा लोक एखाद्या देशाला भेट द्यायला जातात तेव्हा ते फिरण्यापेक्षा तिथले पदार्थ ट्राय करण्यात जास्त उत्सुक असतात.
तुम्ही भविष्यात किंवा आता ऑस्ट्रेलियाला भेट देण्याचा विचार करत असाल तर तिथले स्पेशल पदार्थांवर नक्की एक नजर टाका.




चिकन परमिगियाना
ही नॉनव्हेज प्रेमींसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध असणारी एक अतिशय चवदार डिश आहे. ही डिश तुम्ही एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे, जे तुम्ही जवळजवळ प्रत्येक पबमध्ये सहजपणे खाऊ शकता. हे मेल्टेड चीज आणि परमिगियाना सॉससोबत दिले आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलियाला जाण्याचा विचार करत असाल तर तिथली ही चवदार डिश ट्राय करायला विसरू नका.
बार्बेक्यू स्नॅग
ऑस्ट्रेलियन लोकांना ग्रील्ड फूड खायला आवडते. पारंपारिक ऑस्ट्रेलियन पदार्थांमध्ये डुकराचे मांस खाल्लं जातं. तसेच तिथे ब्रेडचाही मोठ्याप्रमाणात जेवणात समावेश केला जातो.
लॅमिंग्टन
लॅमिंग्टन हा एक केक आहे, जो ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय केक म्हणूनही ओळखला जातो. क्वीन्सलँडचे माजी गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन यांच्या नावावरून या केकचे नाव लॅमिंग्टन ठेवण्यात आले आहे. लॅमिंग्टन हा चौकोनी आकाराचा स्पंजसारखा केक आहे, जो चॉकलेटमध्ये बुडवलेला असतो. त्यावर किसलेले कोरडे खोबरे टाकले जाते. हा केक खायला खूप चविष्ट आहे.
हेही वाचा >> ७२ तास फक्त फळे खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? वाचा डॉक्टर काय सांगतात…
बर्गर
बर्गरमध्ये फक्त टोमॅटो, कांदा, काकडी आणि मांसाचा तुकडा घालून बनवले जात नाही तर ते अनेक प्रकारात बनवता येते. ऑस्ट्रेलियन बर्गर बनवण्यासाठी सर्वप्रथम त्यात बार्बेक्यू केलेले मांस, सॅलड भाज्या, अननसाचे काही तुकडे, काही मसालेदार बीटरूट, तळलेले अंडे आणि सॉस टाकले जातात. हा बर्गर खाल्ल्यानंतर तुम्हाला दुसरा बर्गर खावासा वाटणार नाही.