Pornhub या पॉर्न वेबसाईटने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन लाखो अश्लील व्हिडीओ हटवले आहेत. पॉर्नहबने आपल्या वेबसाइटवरुन जवळपास ९० लाख अश्लील व्हिडिओ हटवलेत. एका रिपोर्टनुसार, Pornhub वेबसाइटवर जवळपास १ कोटी ३० लाख पॉर्न व्हिडिओ होते, पण ही संख्या आता ४० लाखांच्या आसपास आली आहे.

पॉर्नहबच्या वेबसाइटवर जे युजर्स व्हेरिफाइड नव्हते त्यांनी अपलोड केलेले व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. पॉर्नहबने काही दिवसांपूर्वीच वेबसाईटवरचा डाऊनलोड पर्याय काढून टाकला आहे. वेबसाईटवर व्हीडिओ अपलोड करण्यासाठी युझर्सचं अकाऊंट व्हेरिफाय असणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी, अल्पवयीन आणि सेक्स ट्रॅफिकिंगची शिकार झालेल्या मुलींचे व्हिडीओ साइटवरून हटवण्यात पॉर्नहबला अपयश आले असल्याचा आरोप या वेबसाइटवर झाला होता. शिवाय या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर व्हिडिओ असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर व्हिसा आणि मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपन्यांनी पॉर्नहबला मोठा धक्का देताना वेबसाइटसाठी पेमेंट प्रोसेस करण्यास नकार दिला.

दुसरीकडे, theguardian.com च्या रिपोर्टमध्ये, पॉर्नहबच्या या निर्णयामुळे लाखो सेक्स वर्कर्स आणि मॉडेल्सना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो असं म्हटलं आहे. कारण, व्हेरिफाईड नसलेल्या युझर्सना आता पॉर्नहबवर मजकूर टाकण्याची परवानगी नाहीये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, पॉर्नहबने न्यूयॉर्क टाईम्सने केलेले दावे फेटाळलेत. तसेच, मास्टरकार्डने घेतलेला निर्णयही अत्यंत निराशाजनक असल्याचं पॉर्नहबने म्हटलं आहे.