अलीकडे खाजगी दूरसंचार कंपन्यांनी (रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया) त्यांच्या प्रीपेड योजनांच्या किंमती वाढवल्या आहेत. मात्र, मोबाईल वापरकर्त्यांचा त्रास इथेच थांबत नाही. तर आता कंपन्या त्यांच्या पोस्टपेड प्लॅनच्या किंमती देखील वाढवू शकतात. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, इमर्जिंग मार्केट्स टेक्नॉलॉजी, मीडिया आणि एंटरटेनमेंट आणि टेलिकम्युनिकेशन्सचे नेते EY प्रशांत सिंघल यांनी सांगितले की, प्रीपेडनंतर, पोस्टपेड योजनांच्या किंमती देखील वाढू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिपोर्टनुसार एयरटेल आणि व्होडाफोन आयडिया टॅरिफ वाढवू शकतात. प्रशांत सिंघल यांच्या मते, टेरिफमध्ये वाढ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण भारतातील दर जगभरात सर्वात स्वस्त आहे आणि आता प्रीपेड महाग झाल्यानंतर पोस्टपेड देखील महाग होऊ शकतात. विशेष गोष्ट अशी आहे की पोस्टपेड ग्राहकांना किंमतवाढीचा फारसा परिणाम होत नाही आणि ते सहसा त्यांच्या योजना सुरू ठेवतात.

कंपन्यांचे टार्गेट एआरपीयू वाढवणे

टेलिकॉम कंपन्यांनी आधीच हे स्पष्ट केले आहे की प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढवण्यासाठी प्लॅनच्या किंमती वाढवणे आवश्यक आहे. प्रीपेड टॅरिफ वाढवल्याने ARPU मध्ये मदत होईल, तर पोस्टपेड प्लॅन वाढवल्याने कंपनीला अधिक आधार मिळेल. विशेषतः व्होडाफोन-आयडिया (Vi) ला त्याची सर्वात जास्त गरज आहे. Vodafone Idea चा ARPU सध्या १०९ रुपये आहे आणि भारती एयरटेलचा १५३ रुपये आहे. रिलायन्स जिओसाठी ARPU १४३.६ रुपये आहे.

कंपन्यांचा खर्च सातत्याने वाढत आहे

भारतातील दूरसंचार सेवा प्रदात्यांना (टीएसपी) संपूर्ण भारतातील मोबाइल नेटवर्क तयार करण्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रम खरेदी आणि स्थापनेचा खर्च, संशोधन आणि विकास (R&D) उत्तम सेवा देण्यासाठी, देयके, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर अनेक खर्च समाविष्ट आहेत. याउलट, भारतातील स्वस्त टेलिकॉम सेवेमुळे कंपन्या ग्राहकांकडून फारच कमी कमाई करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Postpaid plans will be expensive after prepaid plans can be expensive by 20 25 percentage scsm
First published on: 06-12-2021 at 12:15 IST