scorecardresearch

Ujjwala 2.0 : मोफत एलपीजी कनेक्शनसाठी कसा कराल अर्ज?; जाणून घ्या पात्रता निकष

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला २.० योजनेची सुरुवात करणार आहेत.

Ujjwala 2.0 : मोफत एलपीजी कनेक्शनसाठी कसा कराल अर्ज?; जाणून घ्या पात्रता निकष
१ मे २०१६ पासून केंद्र सरकारने ‘उज्ज्वला योजना’ सुरू केली आहे. ( फोटो PTI)

केंद्र सरकार दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन पुरवण्याची योजना उज्ज्वला उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी नवीन पॅकेजिंगसह पुन्हा सुरू करणार आहे. पंतप्रधान मोदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एलपीजीची ही सुविधा महोबा येथून आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू करतील. या दरम्यान, ते या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला २.० योजनेची सुरुवात करणार आहेत. उज्ज्वला २.० अंतर्गत लाभार्थीला मोफत गॅस कनेक्शन तसेच स्टोव्ह आणि पहिल्यांदाच भरलेले सिलेंडरही मिळेल.

‘उज्ज्वला योजने’विषयी

१ मे २०१६ पासून केंद्र सरकारने ‘उज्ज्वला योजना’ सुरू केली आहे. ‘उज्ज्वला’ ही गरिबी रेषेखालील कुटुंबांना, त्या कुटुंबातील महिलेच्या नावे सवलतीच्या दरात स्वयंपाकाचा एलपीजी गॅस मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून लाभधारकांना सिलिंडर, रेग्युलेटर आणि अन्य उपकरणांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा भार सरकार उचलते. याची एकूण किंमत ३२०० रुपये आहे. यात सरकार १६०० रुपये अनुदान देते. त्याचबरोबर तेल कंपन्या उर्वरित १६०० रुपये ग्राहकांना कर्ज स्वरूपात देतात. ग्राहकांना त्याची ईएमआयच्या माध्यमातून परतफेड करायची असते. १४.२ किलो सिलिंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पहिल्या सहा सिलिंडरमध्ये कोणताही ईएमआय भरावा लागत नाही. सातव्या सिलिंडरपासून ईएमआयची सुरूवात होते.

Ujjwala 2.0 : पंतप्रधान करणार उज्ज्वला योजना-२ चे लोकार्पण; लाभार्थ्यांना मिळणार मोफत स्टोव्ह, LPG रिफिल

पर्यावरण सुरक्षा साधणे आणि गृहिणींचा स्वयंपाकासाठी खर्च होणारा वेळ स्वैपाकाच्या गॅसमुळे आटोक्यात येऊन होणारी वेळेची बचत आणि त्यामुळे सक्षमीकरणाला मिळणारी चालना असे तीन प्रमुख मुद्दे या योजनेत आहेत.

कसा कराल अर्ज –

-बीपीएल कार्डधारक कोणतीही महिला उज्ज्वला योजनाचा लाभ घेऊ शकते.

-जवळच्या एलपीजी सेंटरमध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल. तुम्हाला तेथे केवायसी फॉर्म भरावा लागेल.

-अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इ. आवश्यक आहे.

– पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या वेबसाइटवरून आपण PMUY चा अर्ज डाउनलोड करू शकता.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

– अर्जदाराकडे बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.

– आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र

– पासपोर्ट आकाराचा फोटो

– रेशनकार्डची प्रत

– राष्ट्रीय बँकेत बचत खाते असणे बंधनकारक आहे

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-08-2021 at 08:52 IST

संबंधित बातम्या