भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर असलेली रिलायन्स कंपनीने जून महिन्यात आयोजित केलेल्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांचा सर्वात स्वस्त जिओफोन नेक्स्ट (jio phone next) या  ४जी स्मार्टफोनची घोषणा केली होती. दरम्यान हा स्मार्ट फोन गणेश चतुर्थीला म्हणजे १० सप्टेंबरपासून विक्री करिता उपलब्ध होणार आहे. जिओफोन नेक्स्ट हा कमी किंमतीचा स्मार्टफोन आहे. जो रिलायन्स जिओ आणि गुगलसोबतच्या भागीदारी अंतर्गत फोन तयार केला आहे. या करिता आता जिओफोन नेक्स्टच्या प्री-बूकिंगविषयी माहिती समोर आली असून या फोनच्या किंमतीचा खुलासा देखील करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोन बद्दल अधिक माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओफोन नेक्स्टची किंमत

जिओफोन नेक्स्ट पुढील आठवड्यापासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. रिलायन्स जिओ आणि गुगलसोबतच्या भागीदारी अंतर्गत कंपनीने तयार केलेल्या फोनची किंमत अद्याप अधिकृत माहिती नाही. तरी मिळालेल्या अहवालानुसार हा फोन जवळपास ३,४९९ रुपयात उपलब्ध होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ४४व्या एजीएम दरम्यान दिलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने ही किंमत असू शकते. जिओफोन नेक्स्ट हा देशातील सर्वांना परवडणारा स्मार्टफोन असणार आहे.

जिओफोन नेक्स्टचे फीचर्स

रिलायन्स कंपनीने अद्याप फीचर्सबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मिळालेल्या अहवालानुसार जिओफोन नेक्स्टमध्ये ५.५ इंच डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१५ प्रोसेसर मिळेल. यात २ जीबी / ३ जीबी रॅम आणि १६ जीबी / ३२ जीबी स्टोरेज मिळू शकते. हा फोन अँड्राइड ११ गो एडिशनसोबत येईल. यामध्ये Google Camera Go अ‍ॅप मिळेल, जे HDR, Night Mode आणि Snapchat फिल्टरसोबत येईल. या फोनमध्ये १३ मेगापिक्सल रियर आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.जिओफोन नेक्स्ट हँडसेटमध्ये ड्यूल सिम कार्ड स्लॉट मिळेल. यामध्ये ४जी VoLTE सपोर्ट मिळतो. पॉवरसाठी यात २५०० एमएएचची बॅटरी दिली जाईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre booking of jio phone next will start from next week find out the price and features scsm
First published on: 31-08-2021 at 16:05 IST