Air Pollution Pune Health Department Advisory: महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीची परिस्थिती लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपायांसाठी एक निर्देश जारी केला आहे. येत्या काही दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी फेस मास्क व एअर प्युरिफायर वापरावा तसेच उच्च प्रदूषणाच्या दिवसांमध्ये बाहेरची कामे टाळावीत असे सुचवण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी सतर्क राहण्याची गरज आहे असेही सांगितलेले आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरांमधील हवेची गुणवत्ता मध्यम आणि खराब असल्याचे आढळून आले आहे आणि हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) २०० च्या वर आहे.

हवा प्रदूषणाचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो?

अधिका-यांच्या माहितीनुसार, खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आजार बळावण्याची शक्यता आहे. प्रदूषित हवेमुळे खोकला, चक्कर येणे, छातीत वेदना होणे आणि श्वसन संबंधित संसर्ग, डोळे, नाक आणि घसा यांची जळजळ यासारख्या स्थिती उद्भवू शकतात. वेळीच उपाययोजना न केल्यास श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, फुफ्फुसाचा कर्करोग आणि अकाली मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

हे ही वाचा<< झीनत अमान यांना डोळ्याच्या पापणीच्या ‘या’ आजारामुळे करावी लागली शस्त्रक्रिया; लक्षणे, परिणाम व उपचार वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदूषणाचा धोका वाढताना काय काळजी घ्यावी?

आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ प्रतापसिंह सरणीकर यांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लहान मुले, वृद्ध व आजरी व्यक्तींनी पुढील काही दिवस N95 आणि N99 हे फेस मास्क वापरावा. स्वयंपाकासाठी बायोमास वापरणाऱ्यांनी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जोखीम ओळखून न विसरता/टाळता मास्कचा वापर करावा. आपण जर एअर प्युरिफायर वापरू शकता पण त्यासाठी नियमित अंतराने फिल्टर बदलले आहेत किंवा स्वच्छ केलेले आहेत याची खात्री करावी. बाहेरील हवेचा संपर्क टाळण्यासाठी इमारती आणि वाहनांमधील एअर कंडिशनर री-सर्कुलेट मोडमध्ये वापरावेत.” डॉ सरणीकर पुढे म्हणाले.

  1. उच्च प्रदूषणाची ठिकाणे जसे की उद्योगांजवळील क्षेत्रे, बांधकामाची ठिकाणे, वीज प्रकल्प, वीटभट्ट्या अशा परिसरांमध्ये वावर टाळावा.
  2. आरोग्यदायी आहाराचे पालन करा, फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स घ्या. शरीर हायड्रेटेड ठेवा.
  3. खराब ते गंभीर AQI असलेल्या दिवसांमध्ये, सकाळी आणि संध्याकाळी उशिरा फिरणे, धावणे, जॉग करणे आणि शारीरिक व्यायाम करणे टाळा.
  4. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी बाहेरील दरवाजे आणि खिडक्या उघडू नका
  5. लाकूड, कोळसा, जनावरांचे शेण आणि रॉकेल यांसारखे जैविक पदार्थ जाळणे टाळा
  6. स्वयंपाकासाठी स्वच्छ धुररहित इंधन (गॅस किंवा वीज) वापरा
  7. बायोमास वापरत असल्यास, स्वच्छ स्टोव्ह वापरा
  8. फटाके जाळणे टाळा
  9. कोणत्याही प्रकारचे लाकूड, पाने, पिकांचे अवशेष आणि कचरा उघड्यावर जाळणे टाळा
  10. सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका
  11. बंद जागेवर डासांची कॉइल आणि अगरबत्ती जाळणे टाळा.
  12. घरांमध्ये धूळ झाडून किंवा व्हॅक्यूम वापरून स्वच्छता करण्याऐवजी ओल्या कापडाने घर पुसा
  13. दम लागणे, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा दुखणे किंवा डोळ्यांची जळजळ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.