साप आणि उंदीर यांच्यातील झटापटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भक्ष्याच्या शोधात असणाऱ्या सापाने एका उंदराच्या पिल्लाला तोंडात घेतल्याचे दिसते. त्यानंतर आपल्या पिल्लाची या सापाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी उंदराने चक्क सापावर झडप घातली. सापाने तोंडातील भक्ष सोडून या उंदराबरोबर संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिल्लासाठी लढणाऱ्या मातेसमोर साप मैदानातून पळ काढताना या व्हिडिओत दिसत आहे. आपल्या लेकरावर संकट आल्यास प्राणीदेखील जीवाची बाजी लावायला तयार असतात, याची प्रचिती या व्हिडिओतून तुम्हाला नक्की येईल.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2016 रोजी प्रकाशित
पिल्लाला वाचविण्यासाठी उंदाराने सापावर घातली झडप
आपल्या पिल्लाची या सापाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी उंदराने चक्क सापावर झडप घातली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-07-2016 at 19:18 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rat fights with snake to save her child