चीनच्या Realme कंपनीने गेल्या महिन्यात भारतात Realme 3i हा स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनच्या विक्रीसाठी आज(दि.6) एका खास सेलचं आयोजन करण्यात आलंय. फ्लिपकार्ट आणि Realme च्या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून हा सेल सुरू झालाय. सेलमध्ये फोन खरेदी करणाऱ्यांसाठी काही आकर्षक ऑफर्स देखील आहेत. या फोनसाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सेलमध्ये अवघ्या 30 मिनिटांतच फोन ‘आउट ऑफ स्टॉक’ झाला होता. त्यावेळी या फोनच्या 150,000 युनिट्सची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला होता.
ऑफर्स –
अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 5 टक्के सवलत आहे, तसंच एचडीएफसीच्या डेबिट कार्डने किंवा अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास देखील 5 टक्के डिस्काउंट आहे. तर, MobiKwik या अॅपद्वारे फोन खरेदी केल्यास 10 टक्के सुपरकॅश आणि रिलायंस जिओच्या ग्राहकांनी हा फोन खरेदी केल्यास विविध प्रकारे 5 हजार 300 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. जिओ आणि मोबिक्विकची ऑफर केवळ Realme च्या संकेतस्थळावरुन फोन खरेदी केल्यासच लागू असणार आहे.
फीचर्स – Realme 3i या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाची ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. डायमंड-कट डिझाइनसह असलेला हा स्मार्टफोन डायमंड ब्ल्यू, डायमंड रेड, डायमंड ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 4,230 mAh क्षमतेची बॅटरी असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सलग 11 तास PUBG खेळता येणं शक्य आहे, याशिवाय 21 तास ब्राऊझरवर इंटरनेटचा वापर आणि 13 तास YouTube चा वापर करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून मागील बाजूला AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील एक कॅमेरा 13 मेगापिक्सल तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे.
किंमत –
Realme 3i स्मार्टफोनमध्ये AI फेशियल आणि फिंगरप्रिंट अनलॉक फीचर आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 3GB रॅम+32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आहे, तर 4GB रॅम+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे.