लाल द्राक्षे आणि ब्ल्यूबेरी ही फळे खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
शास्त्रज्ञांनी एकूण ४४६ विविध रासायनिक संयुगांचा वापर करुन रोग प्रतिकारशक्ती प्रणालीवर होणाऱया परिणामांचे परीक्षण केले. यात लाल द्राक्षांमध्ये आढळणारे ‘रेस्वेराट्रोल’ आणि ब्ल्यूबेरीमधील ‘पेट्रोस्तील्बेने’ ही संयुगे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करत असल्याचे आढळून आले. ही दोन्ही संयुगे  ‘डी’ जीवनसत्वाच्या मदतीने शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करतात असे ‘लिनस पौलिंग इंस्टिट्यूट’मधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे लाल द्राक्षे आणि ब्ल्यूबेरी गुणकारी फळे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red grapes and blueberries may boost immunity
First published on: 20-09-2013 at 03:16 IST